चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा घालवण्यासाठी प्रियांका चोप्रा त्वचेवर लावते 'हा' सीक्रेट पदार्थ
वाढत्या वयात महिलांच्या शरीरामध्ये सतत काहींना काही बदल होत असतात. कधी चेहऱ्यावर पिंपल्स येणे तर कधी चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा येऊ लागतात. त्वचेवर आलेल्या या बारीक रेषांमुळे त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. याशिवाय सततच्या धूळ, माती, प्रदूषणाचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे बाहेरून जाऊन आल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घ्यावी. वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करावे. याशिवाय घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहरा अतिशय सुंदर आणि चमकदार होईल. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी घरगुती पदार्थ अतिशय प्रभावी आहेत.(फोटो सौजन्य – pinterest)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे जगभरात सगळीकडे खूप फेमस आहे. तिला सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखले जाते. याशिवाय तिची फॅशन, ड्रेसिंग स्टाईल, तिचा लुक सोशल मीडियावर कायमचं चर्चेत असतो. तसेच प्रियांका आपल्या त्वचेची, केसांची योग्य पद्धतीने काळजी घेते. सर्वच अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. प्रियांका चोप्रा स्किन केअर रुटीनसोबतच सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय सुद्धा करते. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसू लागते. प्रियांका चोप्राचे स्किन केअर रुटीन अतिशय साधे आणि सोपे आहे. जास्त प्रॉडक्टचा वापर न करता त्वचेला सूट होणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा ती कायमचा वापर करते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा घालवण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आईने सांगितलेला घरगुती उपाय सांगणार आहोत. या पदार्थाचा वापर त्वचेवर केल्यास चेहरा अधिक सुंदर, डाग विरहित आणि चमकदार दिसेल.
प्रियांका तिच्या आजीबद्दल बोलताना म्हणाली, त्वचेची काळजी घेण्यासाठी पूर्वी कोणतेही महागडे प्रॉडक्ट, क्रीम्स, लोशन इत्यादी गोष्टींचा वापर केला जात नव्हता. वयाच्या 94 व्या वर्षीसुद्धा आजीच्या त्वचेवर फक्त तीन सुरकुत्या आल्या आहेत. तिच्या सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी ती इतर कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट न वापरता खोबरेल तेलाचा वापर करते. आजी संपूर्ण चेहऱ्यावर खोबरेल तेल लावायची. याशिवाय त्वचेची योग्य काळजी घेतल्यामुळे उतार वयात सुद्धाआजीची त्वचा अतिशय घट्ट आहे. त्वचेवर कोणत्याही खुणा किंवा बारीक रेषा दिसत नाहीत.
कायम सुंदर दिसण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर न करता त्वचेला सूट होणाऱ्या चांगल्या आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेकमहिला त्वचेची काळजी घेताना खोबऱ्याच्या तेलाचा वापर करतात. यामध्ये असलेले अँटीअक्सिडेंट त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे एजिंगच्या खुणा गायब होतात आणि त्वचा कायम तरुण सुंदर दिसते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा.