काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी केळीच्या सालीचा वापर करून 'या' पद्धतीमध्ये बनवा फेसपॅक
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यसोबतच त्वचेची सुद्धा काळजी घ्यावी. कारण जास्त उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा काळवंडून जाते. याशिवाय उन्हाळ्यात बाहेर गेल्यानंतर त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्वचा अधिक चिकट आणि तेलकट होऊन जाते. तेलकट झालेल्या त्वचेवर लगेच पिंपल्स किंवा फोड येऊ लागतात. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना स्कर्फ, सनकोट किंवा उन्हापासून त्वचेचे रक्षण करणाऱ्या गोष्टींचा वापर करावा. कडक उन्हामुळे त्वचेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर रॅश येणे, त्वचेवर बारीक बारीक पुरळ येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी केळीच्या सालीचा वापर करावा. केळीच्या सालीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – iStock)
मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने, जीवन होईल तणावमुक्त
केळीच्या सालीचा वापर करून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. हा फेसपॅक तुम्ही वर्षाच्या बाराही महिने त्वचेवर लावू शकता. याशिवाय त्वचेसंबंधित होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता चेहऱ्याची योग्य काळजी घ्यावी आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात वाढलेले त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी केळीच्या सालीचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक त्वचेवर नियमित लावल्यास चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार दिसेल. वाढलेली उष्णता कमी होऊन त्वचेमध्ये थंडावा टिकून राहील.
आरोग्यासाठी केळी अतिशय पौष्टिक आहेत. त्याप्रमाणेच केळीची साल सुद्धा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होऊन चेहरा उजळदार आणि स्वच्छ दिसू लागतो. फेसपॅक बनवतना सर्वप्रथम, वाटीमध्ये केळीच्या सालीचे तुकडे करून घ्या. त्यानंतर चमच्याने मॅश करा. मॅश करून झाल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर संपूर्ण त्वचेवर फेसपॅक लावून घ्या. त्यानंतर काहीवेळ त्वचेवर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा उपाय नियमित केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल.
याशिवाय या मिश्रणामध्ये तुम्ही लिंबाचा रस, कॉफी, पिठीसाखर, दही सुद्धा मिक्स करू शकता. या पदार्थांमध्ये असलेले गुणधर्म त्वचा उजळदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करतात. या पदार्थांचा त्वचेवर सुंदर परिणाम दिसून येतो.चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स आणि इतर समस्यांपासून सुटका मिळते. तांदळाचे पीठ त्वचा उजळदार करण्यास मदत करते.