Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…! योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना द्या गुरुपौर्णिमेच्या मराठमोळ्या शुभेच्छा

यंदाच्या वर्षी २९ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे.त्यामुळे शाळेतील शिक्षक आणि आईवडिलांप्रती प्रेम व्यक्त करून सगळ्यांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 05:30 AM
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर...! योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना द्या गुरुपौर्णिमेच्या मराठमोळ्या शुभेच्छा

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर...! योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना द्या गुरुपौर्णिमेच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरा केली जाते. यादिवशी आईवडील आणि गुरुंप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. आयुष्यातील अंधकार आणि अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना शुभेच्छा देऊन भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. महाभारताचे रचनाकार महर्षी वेद व्यास यांना आद्य गुरु मानले जाते, म्हणून या दिवशी व्यास पूजन करण्याची परंपरा मागील बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. यंदाच्या वर्षी २९ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे सुद्धा म्हंटले जाते. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे यंदाच्या गुरुपौर्णिमेला सर्व गुरुजनांना द्या या मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – pinterest)

Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेनिमित्त अंगणात काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरात येईल सकारात्मक ऊर्जा

गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरुराया! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

अंधारात दिवा लावणारे, मार्ग दाखवणारे तुम्ही माझे गुरु आहात. तुमच्या चरणी शतशः प्रणाम!

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या सर्व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

जिथे ज्ञानाचे संस्कार दडलेले आहेत, अशा प्रत्येक गुरूला मानाचा मुजरा. शुभ गुरुपौर्णिमा!

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी,
सकळ जना..
तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा..
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सूर्य जवळ ठेवा…

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा.

जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो,
तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला,
तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर
पुन्हा पुन्हा चालायला.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमा विविध संप्रदायांमध्ये कशी साजरी केली जाते? जाणून घ्या संप्रदायातील महत्त्व

गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या सर्व गुरूंना आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Web Title: Guru purnima 2026 share heartfelt marathi wishes with the gurus who guided you on the right path

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Festival News
  • Guru Purnima
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
1

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व
2

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना
3

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
4

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.