यंदाच्या वर्षी २९ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे सुद्धा म्हंटले जाते. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. याच दिवशी वेद व्यासजींचा जन्म झाला होता. गुरूंप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमा आणखीनच स्पेशल करण्यासाठी अंगणात या सुंदर डिझाईनची रांगोळी नक्कीच काढा. रांगोळी काढल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – pinterest)
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेनिमित्त अंगणात काढा 'या' सुंदर डिझाईनची रांगोळी, घरात येईल सकारात्मक ऊर्जा

सणावरांच्या दिवसांमध्ये सर्वच महिला अंगणात रांगोळी काढतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त दारात या डिझाईनची रांगोळी काढल्यास अंगणाची शोभा वाढेल.

हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला सुंदर रांगोळी काढून त्यात सकारात्मक संदेश लिहून रांगोळी पूर्ण करू शकता.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना शुभेच्छा देण्यासोबतच त्यांच्या प्रति प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. त्यामुळे घराच्या अंगणात तुम्ही या डिझाईनची सुंदर रांगोळी काढू शकता.

कामाच्या धावपळीमध्ये रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही सोपी आणि छोटीशी रांगोळी काढून अंगणाची शोभा वाढू शकता.

सणावाराच्या दिवसांमध्ये घरात फुले आणली जातात. पूजा करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या फुलांचं नेमकं काय करावं सुचत नाही. अशावेळी फुलांचा वापर करून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.






