Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

Bagara Rice Recipe : हैदराबादची खासियत असलेला हा बगारा राईस चीवीला साधा पण सुगंधित आणि कमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे. नाॅनव्हेजसोबत खायला जो आणखीनच छान लागतो. याची शाही चव मनाला तृप्त करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 03:30 PM
Recipe : शाही, सुगंधित चवीचा 'बगारा राईस' तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

Recipe : शाही, सुगंधित चवीचा 'बगारा राईस' तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

Follow Us
Follow Us:
  • बगारा राईस हा हैदराबादचा पारंपारिक पदार्थ आहे.
  • हा भात चवीला साधा पण सुगंधित लागतो.
  • हा भात रश्शासोबत खाल्ला जातो. विशेषतः मटण किंवा चिकन करी.
भारतीय स्वयंपाकात भाताचे अनेक प्रकार आढळतात, आणि प्रत्येक प्रकाराची स्वतःची खास चव आणि सुगंध असतो. त्यापैकी बगारा राईस हा हैदराबादी खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि सुगंधी भाताचा प्रकार आहे. हा भात साधा दिसत असला तरी त्यात वापरलेल्या मसाल्यांमुळे आणि फोडणीमुळे त्याची चव खूपच खास बनते. “बगारा” या शब्दाचा अर्थच फोडणी देणे असा होतो, त्यामुळे या भाताची खासियत म्हणजे त्याला दिलेली मसाल्यांची फोडणी.

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा

बगारा राईस सहसा मसालेदार करी, दाल किंवा ग्रेव्ही पदार्थांसोबत खाल्ला जातो. हलका, सुगंधी आणि चविष्ट असल्यामुळे तो रोजच्या जेवणासाठी तसेच खास प्रसंगीही उत्तम पर्याय ठरतो. विशेषतः शाही किंवा दावत शैलीच्या जेवणात याचा समावेश आवर्जून केला जातो. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

  • 1 कप बासमती तांदूळ
  • 2 कप पाणी
  • 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
  • 1 तमालपत्र
  • 1 दालचिनीचा तुकडा
  • 2-3 लवंगा
  • 2 वेलची
  • 1 टीस्पून जिरे
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 8-10 काजू (ऐच्छिक)
  • 1 कांदा (पातळ चिरलेला)
  • 2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • मीठ चवीनुसार
  • थोडी कोथिंबीर सजावटीसाठी
जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 20-30 मिनिटे भिजत ठेवा.
  • कढईत किंवा कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करा.
  • त्यात मोहरी, जिरे घालून फोडणी द्या.
  • नंतर तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि वेलची घालून हलक्या आचेवर परता, जेणेकरून त्यांचा सुगंध बाहेर येईल.
  • आता काजू घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता.
  • त्यात चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  • भिजवलेले तांदूळ गाळून घ्या आणि कढईत घालून 1-2 मिनिटे हलक्या हाताने परता.
  • आता त्यात पाणी आणि मीठ घालून चांगले मिसळा.
  • झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजू द्या. (कुकर वापरत असल्यास 1-2 शिट्ट्या घ्या.)
  • भात शिजल्यावर हलक्या हाताने ढवळा आणि वरून कोथिंबीर घालून सजवा.
  • गरमागरम बगारा राईस रायता, मिरची का सालन, दाल किंवा कोणत्याही ग्रेव्ही पदार्थासोबत सर्व्ह करा.
  • अधिक सुगंधासाठी तूप वापरल्यास चव अधिक छान येते.
  • बासमती तांदूळ वापरल्याने भात दाणेदार आणि हलका होतो.
  • मसाले जास्त भाजू नयेत, अन्यथा चव कडू होऊ शकते.

Web Title: Haiderabad special know how to make bagara rice at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.