जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ
जेवणात किंवा ऑफिसच्या डब्यात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. याशिवाय बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्या किंवा इतर कोणत्याही फळभाज्या पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण दैनंदिन आहारात शरीराला पोषण देण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. भाजी, आमटी किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. कांद्याच्या वापराशिवाय पदार्थाला चांगली चव लागत नाही. आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी कच्च्या कांद्याची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कांद्याची चटणी चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. यापूर्वी तुम्ही खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी खाल्ली असेल. पण झटपट तयार होणारी कांद्याची चटणी नक्कीच बनवून पहा. कांद्याची चटणी तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा ऑफिसमच्या डब्यासाठी सुद्धा बनवून नेऊ शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






