Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

hair Care: केस स्वच्छ करण्यासाठी महिला सतत वेगवेगळ्या शाम्पूचा वापर करतात. पण वारंवार केमिकल शाम्पू वापरण्याऐवजी घरी तयार केलेल्या शाम्पूचा वापर करावा, यामुळे केस मुळांपासून स्वच्छ होतात आणि केसांमधील कोंडा कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2026 | 11:14 AM
Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

Hair Care: वातावरणात सतत होणारे बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता, वांरवार केमिकल शाम्पूचा वापर इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा केसांची गुणवत्ता सुधारत नाही. केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यनंतर हेअर ट्रीटमेंट करून केस अतिशय स्मूथ आणि चमकदार करून घेतले जातात. याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात महागड्या शाम्पूचा वापर करण्याऐवजी घरीच तयार केलेल्या नॅचरल शाम्पूचा वापर करावा. या शाम्पूच्या वापरामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल आणि केस चमकदार दिसून लागतील. (फोटो सौजन्य – istock)

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

शाम्पू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

रिठ्याच्या साली
शिकेकाई
आवळा पावडर
पाणी

कृती:

शाम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रिठ्याच्या साली घालून रात्रभर भिजत ठेवा. त्यामध्येच शिकेकाई, आवळा पावडर सुद्धा घाला. सर्व मिश्रण रात्रभर भिजल्यानंतर टोपात ओतून गॅसवर गरम करून घ्या. १५ ते २० मिनिटे उकळून आल्यानंतर पदार्थांचा अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर तयार केलेले मिश्रण थंड करून चमच्याने किंवा हाताने मॅश करा. तयार केलेले मिश्रण गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. तयार आहे झटपट बनवलेला नॅचरल शाम्पू.

केस धुवताना मिश्रण सर्वप्रथम केस पाण्याने ओले करून घ्या. त्यानंतर केसांवर थोडासा शाम्पू ओता आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवर चिकटलेला कोंडा कमी होण्यासोबतच केस आतून स्वच्छ होतील. त्यानंतर साधे पाणी ओतून केस पाण्याने स्वच्छ करा. रिठ्याच्या सालींचा वापर केल्यामुळे केसांना जास्त फेस येणार नाही. त्यामुळे अतिप्रमाणात शाम्पूचा वापर करू नये. केस खूप कोरडे किंवा गुंतणारे असतील तर शाम्पूचा वापर केल्यानंतर कंडिशनर लावणे आवश्यक आहे. अन्यथा केस खूप जास्त कोरडे होऊन जातील. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या शाम्पूच्या वापरामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

तयार केलेला शाम्पू दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस वापरू नये. आठवडाभर पुरेल एवढाच शाम्पू तयार करावा. घरी बनवलेल्या शाम्पूमध्ये कोणतीही प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे तो खराब सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शाम्पूचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. संवेदनशील त्वचा असलेल्यास टाळूवर कोरडेपणा किंवा जळजळ वाढू शकते. त्यामुळे शाम्पू तयार करताना योग्य प्रमाण वापरूनच शाम्पू बनवावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair care instead of using store bought shampoo make herbal shampoo at home in just 10 minutesinutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • amla for hair
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
1

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
2

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच
3

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
4

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.