केस गळून पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ, केसांच्या वाढीवर दिसून येतील सकारात्मक परिणाम
Hair Care: सर्वच महिलांसह पुरुष सुद्धा केसांची काळजी घेतात. पण वातावरणात सतत होणारे बदल आणि जीवनशैलीचा परिणाम केसांच्या गुणवत्तेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केस गळणे, केसांमध्ये कोंडा, केस तुटणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर बाजारातील महागड्या हेअर केअरचा वापर केला जातो. पण कायमच केमिकलयुक्त स्किन केअर केसांसाठी वापरामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि केस आणखीनच कोरडे, निस्तेज होऊन जातात. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी खोबरेल तेलात हे पदार्थ मिक्स करून लावावेत. यामुळे केसांची वाढ होते आणि केस चमकदार दिसतात.
तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये खोबरेल तेल घेऊन गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम करताना गॅस मंद आचेवर ठेवावा. त्यानंतर त्यात मेथी दाणे, कढीपत्ता, जास्वदींची फुले आणि पाने घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करा आणि ५ ते १० मिनिटं शिजण्यासाठी ठेवा. तयार केलेले तेल बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. तयार केलेले तेल केस धुवण्याच्या एक दिवस आधी लावावे. खोबऱ्याच्या तेलात असलेले गुणकारी घटक केस मऊ करण्यास मदत करतात.
तयार केलेले तेलाने केसांना हलक्या हाताने मसाज करावी. मसाज केल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि केस घनदाट दिसतात. या तेलाच्या वापरामुळे केस हळूहळू वाढतात आणि टाळूवर वाढलेला कोंडा आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. मेथी आणि जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले घटक टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. याशिवाय जास्वंदातील नैसर्गिक घटकांमुळे केसांचा काळा रंग तसाच टिकवून ठेवतात. त्यामुळे कायमच महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.
केसांना तेल लावण्याआधी ते कोमट गरम करून घ्यावे. त्यानंतर हाताने संपूर्ण टाळूवर आणि केसांच्या टोकांवर लावावे. यामुळे केस वाढण्यास मदत होते. रात्रभर तसेच ठेवल्यानंतर सकाळी सौम्य शाम्पूचा वापर करून केस पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावावे. हानिकारक केमिकलचा वापरामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा.
Ans: होय. खोबरेल तेल केसांच्या बाह्य थरात प्रवेश करून प्रथिनांचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे केसांचा कोरडेपणा आणि तुटणे कमी होण्यास मदत होते.
Ans: खोबरेल तेलामध्ये आवळा, कढीपत्त्याची पाने किंवा मेथीदाणे यांसारखे घटक मिसळून घरगुती हेअर ऑइल तयार करता येते. मात्र या मिश्रणामुळे केसांची वाढ वेगाने होते, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
Ans: कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि काही पोषक घटक असतात. खोबरेल तेलासोबत त्याचा वापर केल्याने केसांना तेलकटपणा आणि मऊपणा मिळू शकतो. मात्र केसगळती थांबण्याची खात्री देता येत नाही.






