Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ

केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर खोबरेल तेलात लिंबाचा रस मिक्स करून लावल्यास टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि केसांची झपाट्याने वाढ होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2026 | 02:40 PM
पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' स्वयंपाक घरातील पदार्थ

पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' स्वयंपाक घरातील पदार्थ

Follow Us
Follow Us:

जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. यामुळे टाळूवरील केस गळून टक्कल पडण्याची खूप जास्त भीती निर्माण होते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिलांसह पुरुषसुद्धा बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्याऐवजी केस आणखीनच खराब होऊन जातात. याशिवाय काहीवेळा मधुमेह किंवा इतर गंभीर आजारांच्या औषधांमुळे सुद्धा केस गळतात.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर

केस गळती थांबवण्यासाठी कायमच महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी आयुर्वेदिक उपाय करणे फार आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये खोबरेल तेलाला विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला खोबरेल तेलाचा वापर करतात. त्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देण्यासाठी खोबरेल तेलात हे पदार्थ मिक्स करून लावावेत. यामुळे केसांना नैसर्गिकरित्या पोषण मिळते. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ केसांना आवश्यक पोषण देतात. त्यामुळे तयार केलेले तेल केसांच्या मुळांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.

वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा कमी होण्यासोबतच केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. केस स्वच्छ करण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करावा. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कायम टिकून राहील आणि केस हायड्रेट राहतील. सलग दोन ते तीन दिवस केसांवर लिंबाचा रस मिक्स करून तयार केलेले मिश्रण लावावे.

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

लिंबाचा रस कधीही केसांवर थेट लावू नये. कारण लिंबात असलेले सायट्रिक ॲसिड केसांच्या मुळांवर लावल्यास केस आणखीनच खराब होऊ शकतात. याशिवाय जळजळ, खाज किंवा लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळे केसांना लिंबाचा रस लावण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. खोबरेल तेल लिंबाचा रस मिक्स करून लावल्यास केस महिनाभरात सुंदर आणि घनदाट होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair care thinning hair will become thick and strong within a month mix this kitchen ingredient with coconut oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
1

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
2

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
3

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण
4

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.