घामामुळे केस सतत चिकट होतात? 'हे' घरगुती उपाय केल्यास केस राहतील मुलायम
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये घामाची समस्या उद्भवू लागते. शरीरात साचलेले विषारी घटक घामावाटे बाहेर पडून जातात. पण वारंवार येणाऱ्या घामामुळे त्वचा अतिशय चिकट होऊन जाते. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केस अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जातात. चिकट झालेले केस योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. पावसाळ्यात घामामुळे भिजलेले केस आणि पावसाळ्याच्या पाण्यामुळे केस भिजून जातात. बऱ्याचदा भिजलेल्या केसांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता केस स्वच्छ करून कोरडे करणे आवश्यक आहे. केस भिजल्यानंतर केसांमधून घामाचा वास येणे, कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. सतत येणाऱ्या घामामुळे केसांची वाढ थांबते. घामामुळे केस अतिशय कमकुवत होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात चिकट आणि तेलकट झालेले केस सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल. घरगुती उपाय केल्यामुळे केस अधिक सुंदर होतील.
टाळूवर घामामुळे कोंडा होतो. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेल त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी आहे. यासाठी केस धुवण्याआधी टाळूवर कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर २० मिनिटं ठेवून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल आणि केस सॉफ्ट होतील.
केसांसाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर अतिशय गुणकारी ठरेल. या पानांमध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म टाळू स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमधील कोंडा आणि टाळू स्वच्छ होण्यास मदत होईल. केसांची खुंटलेली वाढ सुधारण्यासाठी कडुलिंबाची पाणी प्रभावी ठरतील.
प्रत्येकाच्या घरात व्हिनेगर उपलब्ध असतेच. जेवणातील पदार्थ बनवताना व्हिनेगरचा वापर केला जातो. यामुळे टाळूवर येणारा घाम नियंत्रणात राहील. व्हिनेगरचा वापर केल्यामुळे टाळूचे पीएच संतुलित राहते. वाटीमध्ये एक चमचा व्हिनेगर घेऊन त्यात पाणी मिक्स करा. तयार केलेले मिश्रण कापसाच्या सहाय्याने टाळूवर लावून घ्या. यामुळे तुमचे केस स्वच्छ होतील.