हिरव्यागार दुर्वा केसांसाठी ठरतील वरदान! 'या' पद्धतीने घरीच करा दुर्वांचा हेअर मास्क
गणपती बाप्पाच्या पूजेची सुरुवात दुर्वा अर्पण करून केली जाते. याशिवाय धार्मिक पूजा, सण – विधी इत्यादी अनेक ठिकाणी दुर्वाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. धार्मिक पूजेसाठी वापरला जाणारा दुर्वा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. या दुर्वाचा वापर केसांसाठी सुद्धा केला जातो. बऱ्याचदा केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा केसांच्या समस्या दूर होत नाहीत. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्याही हानिकारक रसायनांपासून बनवलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. केसांचे सौंदर्य कायम टिकून राहावे यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ वापरावे.(फोटो सौजन्य – istock)
केसांची वाढ खुंटली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय करून केस करा मजबूत आणि घनदाट, केसांची होईल झपाट्याने वाढ
वर्षाच्या बाराही महिने केसांसंबधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर तुम्ही दुर्वांचा वापर करू शकता. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. दुर्वाचा हेअरमास्क केसांसाठी अतिशय गुणकारी ठरतो. कमीत कमी खर्चात निरोगी केसांसाठी तुम्ही दुर्वाचा वापर करू शकता. यामुळे केसांची चमक वाढते. अचानक केस तुटणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केसांसंबधित उद्भवणाऱ्या विविध समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दुर्वाचा वापर करावा. यामुळे केस सुंदर होतात.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या दुर्वा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, विटामिन ‘ए’ आणि ‘सी’, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी दुर्वाचा वापर करावा. केस गळणे आणि तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दुर्वाचा हेअरमास्क फायदेशीर ठरेल. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दुर्वाचा हेअरमास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
दुर्वाचा हेअरमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या दुर्वा टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल किंवा कोरफड जेल घालून मिक्स करा. तयार केलेला हेअरमास्क हातांच्या सहाय्याने संपूर्ण केसांवर लावून घ्या. त्यानंतर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने केसांच्या मुळांवर मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास केस चमकदार आणि सुंदर होतील. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल.