Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Fall: केस गळतीने त्रस्त आहात? आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश; काही दिवसांत दिसेल फरक

Superfoods to Control Hair fall: केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी केवळ महागडे उपचार नव्हे, तर योग्य आणि पोषणयुक्त आहारही तितकाच महत्त्वाचा ठरतो. प्रोटीन, आयर्न, बायोटिन, ओमेगा-३ आणि इतर आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध ७ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास केस मजबूत होण्यास आणि त्यांची वाढ सुधारण्यास मदत होऊ शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 08, 2026 | 07:44 PM
Hair Fall: केस गळतीने त्रस्त आहात? आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश; काही दिवसांत दिसेल फरक
Follow Us
Follow Us:
  • केस गळतीने त्रस्त आहात?
  • आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
  • काही दिवसांत दिसेल फरक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केस गळण्याची समस्या केवळ वाढत्या वयापुरती मर्यादित राहिलेली नाही. तरुणांपासून प्रौढांपर्यंत अनेकजण केस गळतीमुळे चिंतेत आहेत. ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी, पोषक घटकांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, प्रदूषण आणि अनियमित दिनचर्या यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात. अनेकजण महागडे शॅम्पू, सिरम किंवा उपचारांचा आधार घेतात. मात्र शरीराला आतून योग्य पोषण मिळाले नाही तर केसांचे आरोग्य सुधारत नाही. संतुलित आणि पोषणयुक्त आहार केसांची मुळे मजबूत करण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करू शकतात. विशेषतः प्रोटीन, आयर्न, बायोटिन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, झिंक आणि विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध अन्नपदार्थ केसांसाठी फायदेशीर ठरतात.

Monsoon Health: पावसाळ्यात बाहेरचे ‘हे’ चटपटीत पदार्थ खाणे टाळा; अन्यथा वाढू शकतो फूड पॉइझनिंगचा धोका

अंडी

अंडी ही प्रोटीन आणि बायोटिनचा उत्तम स्रोत मानली जातात. केस मुख्यतः केराटिन या प्रोटीनपासून बनलेले असल्याने पुरेसे प्रोटीन मिळणे आवश्यक असते. बायोटिन केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची मजबुती वाढवण्यास मदत करू शकते.

पालक

पालकामध्ये आयर्न, फोलेट, जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व C आणि इतर महत्त्वाची खनिजे भरपूर प्रमाणात असतात. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास केसगळती वाढू शकते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचा नियमित आहारात समावेश फायदेशीर ठरतो.

ड्राय फ्रुट्स आणि बिया

बदाम, अक्रोड, जवस, भोपळ्याच्या बिया आणि चिया बियांमध्ये ओमेगा-३, झिंक, जीवनसत्त्व E आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात. हे घटक टाळूचे आरोग्य सुधारण्यास आणि केसांच्या मुळांना बळकटी देण्यास मदत करतात.

कडधान्ये

मूग, मसूर, हरभरा, राजमा आणि इतर कडधान्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि झिंक मुबलक प्रमाणात असते. विशेषतः शाकाहारींसाठी ही पोषणाची उत्तम पदार्थ असून केसांच्या वाढीस आवश्यक घटकांची पूर्तता करण्यास फायदेशीर ठरतात.

फॅटी फिश

सॅल्मन, सार्डिन किंवा मॅकेरलसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि जीवनसत्त्व D असते. हे घटक केसांची वाढ आणि टाळूचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.

रताळे

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक असते. शरीरात त्याचे जीवनसत्त्व A मध्ये रूपांतर होते. हे जीवनसत्त्व टाळूतील नैसर्गिक तेलाचे संतुलन राखण्यास मदत करते आणि केस निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते.

दही

दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते आणि शरीराला पोषक घटकांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करता येते. त्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या आरोग्यावरही दिसू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sudden Weight Gain: अचानक वजन वाढतंय? शरीरातील ‘हे’ गंभीर संकेत ओळखायला करू नका उशीर

Web Title: Hair fall control diet best foods for hair growth hair loss prevention marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • hair care tips in marathi
  • hair fall reason
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर
1

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Bones Health: फक्त कॅल्शियमची कमतरता नव्हे, ‘या’ रोजच्या सवयीही हाडांना करतात कमकुवत
2

Bones Health: फक्त कॅल्शियमची कमतरता नव्हे, ‘या’ रोजच्या सवयीही हाडांना करतात कमकुवत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.