
आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स
केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण याच समस्या कालांतराने वाढत जातात आणि गंभीर स्वरुप घेतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीला महिला दुर्लक्ष करतात. पण काही दिवसांमध्ये केसांमध्ये टक्कल, भरपूर कोंडा किंवा चाई पडल्यानंतर केसांची पूर्णपणे वाट लागून लागते. यासोबतच चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, झोपेची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. पण केसांच्या वाढलेल्या समस्या कमी करण्यासाठी केवळ केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्टच नाहीतर नैसर्गिकरित्या हेअर डिटॉक्स केल्यास केसांच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. त्यामुळे विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हेअर डिटॉक्स करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
हेअर डिटॉक्स केल्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा, केस गळणे आणि केसांच्या इतर सर्वच समस्यांपासून कायमचा आराम मिळेल. यामुळे केसांची हरवलेली चमक पुन्हा परत येईल आणि केस अतिशय सुंदर दिसतील. थंडीच्या दिवसांमध्ये केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो. कोंडा वाढल्यामुळे केसांमध्ये सतत खाज येते. या सर्व समस्या हेअर डिटॉक्स केल्यामुळे कमी होतात. हेअर डिटॉक्स करणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे केसांच्या मुळांचे किंवा केसांचे कोणतेही नुकसान होत नाही. चला तर जाणून घेऊया हेअर डिटॉक्स करण्याची सोपी पद्धत.
हेअर डिटॉक्स करताना पहिल्या आठवड्यात केसांचे शुद्धिकरण करा. यासाठी आठवड्यातून दोनदा कडुलिंबाच्या पानांचा वापर करून बनवलेल्या तेलाचा वापर करून केसांवर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवर चिकटलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर केस स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त शाम्पूचा वापर न करता रीठा–शिकेकाई पावडर भिजवून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट केसांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस आतून स्वच्छ होतील.
केसांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून एकदा कोरफड जेल आणि दही मिक्स करून केसांवर लावावे. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि केस मऊ होतील. केसांवरील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर ठरते. यासोबतच रोजच्या आहारात तिखट, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये.
केस मजबूत करण्यासाठी भृंगराज तेलाने नियमित मालिश करा. यामुळे केस गळणे कमी होईल आणि केसांची झपाट्याने वाढ होईल. भृंगराज तेलाच्या वापरामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते. केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा जास्वदींच्या कंडिशनरचा वापर करावा. जास्वंदाची फुले पाण्यात मिक्स करून कंडिशनर तयार करावे. यामुळे केस मऊ होतात.