Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे

सतत केस गळून भांगात टक्कल पडल्यास कोणत्याही हेअर ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला नॅचरल हेअर स्प्रे बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 01:43 PM
वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? या पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? या पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस गळतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा, केस तुटणे इत्यादी सामान्य समस्या आहे. पण तरुण वयात केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर त्याकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. याच समस्या हळूहळू मोठ्या होतात आणि केसांचे नुकसान करतात. हवेमध्ये वाढलेला दमटपणा हळूहळू टाळूवर कोंडा निर्माण करतो. टाळूवर वाढलेल्या कोंड्यामुळे केसांमध्ये सतत खाज येणे किंवा इन्फेक्शन वाढून नाजूक त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कोंडा आणि स्काल्प इन्फेक्शन वाढता धोका कमी करण्यासाठी महिला महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. तर काहीवेळा केस गळणे थांबवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले हेअर सीरम किंवा हेअर ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते.(फोटो सौजन्य – istock)

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर वारंवार हेअर केअर ट्रीटमेंट किंवा हेअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. केसांच्या निरोगी वाढीसाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून नॅचरल हेअर स्प्रे बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा हेअर स्प्रे केसांच्या वाढीसोबतच केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत करेल. आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर केसांसाठी केल्यास केस घनदाट होण्यासोबतच मजबूत होतील.

हेअर टोनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • पाणी
  • रोझमेरी
  • तांदूळ
  • मेथी दाणे
  • अळशीच्या बिया

कृती:

हेअर स्प्रे बनवण्यासाठी सर्वप्रथम, भांड्यात पाणी घेऊन त्यात रोझमेरी, तांदूळ, मेथी दाणे आणि अळशीच्या बिया घालून सर्व साहित्य उकळविण्यासाठी ठेवा. पाण्याला मंद आचेवर उकळी काढा. पाण्याला उकळी आल्यानंतर मिश्रण घट्ट झाल्यानंतर थंड करून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरावे. तयार केलेला हेअर स्प्रे फ्रिजमध्ये ठेवून दिल्यास १० ते १२ दिवस व्यवस्थित टिकून राहील.

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी

हेअर स्प्रे कायमच रात्री झोपण्याआधी किंवा केस धुवण्याच्या २ तास आधी केसांवर लावून हलक्या हाताने स्प्रे करावे. हेअर स्प्रे केल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यासोबतच केसांची वाढ होण्यास मदत होईल. मेथी दाण्यांमध्ये असलेले पोषक घटक टाळूवर वाढलेला कोंडा कमी करतात, तर तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास केसांची मूळ मजबूत होऊन केस अतिशय घनदाट होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Has your hair parting widened while you are still in your twenties prepare a natural hair spray at home using these ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत
1

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
2

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
3

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
4

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.