Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

Simple Home Hacks: कोरड्या त्वचेवर कायमच महागड्या केमिकल युक्त क्रीम लावण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा उपाय केल्यास आठवडाभरात त्वचा आतून सुंदर आणि चमकदार होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 10, 2026 | 09:58 AM
त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला 'हा' उपाय नक्की पहा करून

त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला 'हा' उपाय नक्की पहा करून

Follow Us
Follow Us:

कोरड्या त्वचेसाठी उपाय?
दुधाच्या सायीचे त्वचेला होणारे फायदे?
कोरड्या त्वचेसाठी कोणता फेसपॅक उपयुक्त?

simple home hacks: कामाच्या धावपळीमध्ये त्वचेच्या काळजी घ्याल वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच सणावारांच्या दिवसांमध्ये पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे क्लीनअप, फेशिअल, ब्लीच किंवा इतर वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. या ट्रीटमेंटमुळे त्वचेवर तात्पुरता ग्लो येतो आणि पुन्हा एकदा त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. वातावरणात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागड्या केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी पडून जाते आणि चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो.

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

वातावरणात सतत होणारे बदल त्वचेची गुणवत्ता खराब करून टाकतात. याशिवाय हानिकारक केमिकल त्वचेवरील ओलावा नष्ट करून कोरडी करतात. त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी महागडे उपाय करण्याऐवजी अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा घरगुती उपाय नक्कीच करून पाहावा. यामुळे त्वचेवरील ग्लो वाढण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ होईल आणि त्वचेची गुणवत्ता सुधारेल. अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर त्वचेसंबंधीत समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सतत काहींना शेअर करत असते. हे उपाय केल्यास त्वचा मुलायम होईल.

काेरड्या त्वचेसाठी भाग्यश्रीने सांगितलेला सोपा उपाय:

त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर स्किन केअर रुटीनमध्ये बदल न करता दररोज सकाळी उठल्यानंतर दुधाची थंडगार साय घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि ४ ते ५ मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील. दूध रात्रभर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर सकाळी दुधाची साय व्यवस्थित जमा होईल. हीच साय तुम्ही त्वचेवर लावू शकता. थंड सायीमध्ये ॲक्टीव्ह हाेणारे कंपाउंड त्वचेसाठी गुणकारी ठरतात.

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

कोरड्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घ्यावी:

तुमची त्वचा जर खूप जास्त कोरडी असेल तर वरून पोषण देण्यासोबतच त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यासाठी नियमित भरपूर पाणी, ताक आणि संतुलित आहार घेणे फार आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर बेसन, दुधावरील साय आणि मसूर डाळीच्या पिठाचा फेसपॅक लावणे फार आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. दुधाच्या सायीचा वापर केल्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: त्वचा खूप कोरडी आणि रखरखीत होण्याची कारणे कोणती?

    Ans: थंड किंवा कोरडे हवामान, गरम पाण्याने वारंवार अंघोळ करणे, कठीण साबणांचा वापर, कमी आर्द्रता आणि त्वचेची योग्य काळजी न घेणे यामुळे त्वचा कोरडी पडू शकते.

  • Que: अभिनेत्री भाग्यश्री यांनी कोरड्या त्वचेसाठी कोणता उपाय सांगितला आहे?

    Ans: भाग्यश्री यांनी सोशल मीडियावर त्वचेची निगा राखण्यासाठी विविध घरगुती उपाय आणि स्किनकेअर टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांच्या सांगितलेल्या उपायाचा वापर करण्यापूर्वी तो आपल्या त्वचेला योग्य आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

  • Que: कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय किती वेळा करावा?

    Ans: उपायातील घटकांवर आणि त्वचेच्या प्रकारावर अवलंबून वापराची वारंवारता बदलते. कोणताही नवीन उपाय रोज करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य ठरते.

Web Title: Has your skin become extremely rough and dry then definitely try this remedy shared by actress bhagyashree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
2

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो
3

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
4

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.