Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Missi Roti Recipe : गहू आणि बेसनापासून तयार केली जाणारी खमंग आणि पाैष्टीक चपाती, तुम्ही कधी मेस्सी रोटी खाल्ली आहे का?

Recipe : गहू, बेसन आणि काही मसाल्यांचा वापर करुन खमंग चपाती तयार केली जाते ज्याचा मिस्सी रोटी असं म्हटलं जातं. शेतात कामाला जाताना अनेक शेतकरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2026 | 09:19 AM
Missi Roti Recipe : गहू आणि बेसनापासून तयार केली जाणारी खमंग आणि पाैष्टीक चपाती, तुम्ही कधी मेस्सी रोटी खाल्ली आहे का?

Missi Roti Recipe : गहू आणि बेसनापासून तयार केली जाणारी खमंग आणि पाैष्टीक चपाती, तुम्ही कधी मेस्सी रोटी खाल्ली आहे का?

Follow Us
Follow Us:
  • मिस्सी रोटीचा उगम उत्तर भारतातील ग्रामीण भागातील स्वयंपाकघरांमध्ये आढळून येतो.
    ही रोटी फक्त चवीलाच स्वादिष्ट लागत नाही तर आरोग्यासाठीही ती फायद्याची ठरते.
    चला या मिस्सी रोटीची रेसिपी नोट करुन घेऊयात.
भारतीय खाद्यसंस्कृतीत विविध प्रकारच्या रोट्यांना विशेष स्थान आहे. त्यापैकी मिस्सी रोटी ही उत्तर भारतातील विशेषतः पंजाब आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय असलेली पारंपरिक रोटी आहे. मिस्सी रोटीमध्ये बेसन असल्याने प्रथिने आणि तंतुमय घटक अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे ही रोटी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. दही, लोणी, लोणचे किंवा कोणत्याही मसालेदार भाजीसोबत तिचा आस्वाद अधिक खुलतो. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही वेळी हा पदार्थ बनवता येतो. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही मिस्सी रोटी एकदा करून पाहिल्यास तिची चव नक्कीच आवडेल. चला रेसिपी जाणून घेऊया.

साध्या मॅगीला द्या हटके ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा चिली गार्लिक टोमॅटो मॅगी, नोट करा रेसिपी

साहित्य

  • १ कप गव्हाचे पीठ
  • १ कप बेसन
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  • १ टीस्पून ओवा
  • ½ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून धने-जिरे पूड
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून तेल किंवा तूप
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • भाजण्यासाठी तूप किंवा तेल
Breakfast Recipe : साउथ स्टाईल ‘घी पोडी डोसा’ बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

कृती

  • एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड, ओवा, हिंग आणि मीठ एकत्र करून व्यवस्थित मिसळा.
  •  त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करा.
  • आता तेल घालून मिश्रण हाताने चोळा. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत मऊसर पण घट्टसर पीठ मळून १५–२० मिनिटे झाकून ठेवा.
  • पीठाचे समान आकाराचे गोळे करून गव्हाच्या पिठाचा हलका वापर करत मध्यम जाडीच्या रोट्या लाटा.
  • गरम तव्यावर रोटी दोन्ही बाजूंनी हलकी भाजून घ्या. नंतर तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी डाग येईपर्यंत भाजा.
  • सर्व रोट्या याच पद्धतीने तयार करा. भाजताना मध्यम आचेचा वापर केल्यास रोटी आतूनही छान शिजते.
  • गरमागरम मिस्सी रोटीवर थोडे लोणी किंवा तूप लावून दही, पनीरची भाजी, डाळ किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या.
 

Web Title: Have you ever eat missi roti note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe : साउथ स्टाईल ‘घी पोडी डोसा’ बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी
1

Breakfast Recipe : साउथ स्टाईल ‘घी पोडी डोसा’ बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा
2

Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा

प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी
3

प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी

आठवडाभरात थांबेल केस गळणे! ‘या’ पद्धतीने बनवा पौष्टिक कढीपत्त्याची चटणी, चमचाभर पदार्थाने मिळेल शरीराला पोषण
4

आठवडाभरात थांबेल केस गळणे! ‘या’ पद्धतीने बनवा पौष्टिक कढीपत्त्याची चटणी, चमचाभर पदार्थाने मिळेल शरीराला पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.