Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Lemon Cake Recipe : केक हा फक्त वाढदिवस साजरा करण्यासाठी नाही तर आनंद साजरा करतानाही खाल्ला जातो. आनंदाच्या वेळी आता बाहेरून कशाला घरीच बनवा सॉफ्ट, सुगंधित आणि चवीने भरलेला लेमन केक.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 21, 2026 | 09:46 AM
जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर... तुम्ही कधी 'लेमन केक' खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर... तुम्ही कधी 'लेमन केक' खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • केक एक गोडाचा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो.
  • आपण आजवर चॉकलेट, व्हॅनिला असे फ्लेवरचे केक खाल्ले आहेत.
  • पण तुम्ही कधी लेमन केक खाल्ला आहे का? याची चव फार अप्रतिम लागते.
तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे केक खाल्ले असतील, पण लिंबाची हलकी आंबट चव, ताजेतवाना सुगंध आणि अतिशय सॉफ्ट टेक्सचर असलेला लेमन केक कधी चाखला आहे का? गोड-आंबट चवीचा परफेक्ट समतोल आणि लिंबाचा नैसर्गिक फ्लेवर यामुळे हा केक इतर केकपेक्षा वेगळा ठरतो. तो खूप जड न वाटता हलका आणि फ्रेश वाटतो. अनेकांना वाटते की बेकरीसारखा चविष्ट लेमन केक घरी बनवणे कठीण आहे, पण तसे अजिबात नाही. योग्य पद्धत आणि थोडेसे संयम ठेवले तर तुम्ही हा केक अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता.

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी

साधारणपणे उन्हाळ्यात लेमन केक अधिक आवडीने खाल्ला जातो कारण तो खूप रिफ्रेशिंग वाटतो, पण हिवाळ्यातही तो तितकाच छान लागतो. गोड खाण्यासाठी कोणत्याही ऋतूची वाट पाहावी लागत नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा केक आवडतो. विशेष म्हणजे यासाठी फार क्लिष्ट किंवा महागडे साहित्यही लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया लेमन केकची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य

  • दोन ऑर्गेनिक किंवा न प्रोसेस केलेले लिंबू
  • तीन चतुर्थांश कप साखर
  • चार अंडी
  • दीड कप मैदा
  • थोडे अधिक दोन मोठे चमचे मैदा
  • एक तृतीयांश कप कॉर्नस्टार्च
  • दीड छोटा चमचा बेकिंग पावडर
  • चिमूटभर मीठ
  • अर्धा कप दही
  • सुमारे सव्वा कप वितळलेले बटर
  • थोडेसे व्हॅनिला एसेंस
  •  शुगर पावडर
लेमन सिरपसाठी
  • थोडे पाणी
  • लिंबाचा रस
  • साखर
रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग, नोट करून घ्या रेसिपी

कृती 

  • सर्वप्रथम एका भांड्यात साखर घ्या आणि त्यात लिंबाची साल बारीक किसून घाला. किसताना फक्त वरचा पिवळा भाग वापरा, पांढरा भाग टाळा कारण तो कडू लागतो. साखर आणि लिंबाची साल हाताने चांगली चोळून मिसळा, त्यामुळे लिंबाचा सुगंध साखरेत मुरतो.
  • यानंतर या मिश्रणात अंडी फोडून घाला आणि व्हिस्करच्या साहाय्याने चांगले फेटा. मिश्रण हलके, फुललेले आणि क्रीमी होईपर्यंत फेटणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे केक मऊ आणि स्पंजी बनतो. आता या मिश्रणात मैदा, कॉर्नस्टार्च, बेकिंग पावडर आणि मीठ घाला.
  • हे सर्व हलक्या हाताने मिसळा किंवा ब्लेंडरने स्मूद होईपर्यंत ब्लेंड करा. त्यानंतर वितळलेले बटर, दही आणि व्हॅनिला एसेंस घालून पुन्हा एकदा नीट मिसळा. यामुळे केकचा बॅटर गुळगुळीत आणि परफेक्ट तयार होईल.
    केकचा साचा घ्या, त्याला आतून ग्रीस करून पार्चमेंट पेपर लावा.
  • तयार बॅटर साच्यात ओता आणि साचा हलकेच टेबलावर दोन-तीन वेळा आपटून घ्या, जेणेकरून हवेचे बुडबुडे निघून जातील.
  • आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये हा केक साधारण पन्नास मिनिटे बेक करा. बेक झाल्यावर केकचा रंग सुंदर सोनेरी तपकिरी दिसेल आणि त्याचा सुगंध संपूर्ण किचनमध्ये पसरलेला असेल. टूथपिक किंवा सुरी केकच्या मध्यभागी घालून पाहा. ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे.
  • आता लेमन सिरप तयार करा. एका पॅनमध्ये पाणी आणि साखर घालून साखर पूर्ण विरघळेपर्यंत गरम करा. गॅस बंद केल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. हा गरम सिरप केकवर हळूच ओता, ज्यामुळे केक अधिक ओलसर आणि चविष्ट बनेल. शेवटी वरून शुगर पावडर चाळून भुरभुरा.
  • अशा प्रकारे तयार आहे तुमचा घरगुती, मऊ, सुगंधी आणि अप्रतिम चवीचा लेमन लोफ केक. चहासोबत किंवा गोड म्हणून हा केक नक्कीच सगळ्यांची मनं जिंकेल.

Web Title: Have you ever try soft juicy and refreshing lemon cake note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.