Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नखांचा रंग फिकट झाला आहे? महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

हिमोग्लोबिन शरीरात लाल रक्त पेशी तयार करण्याचे काम करते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते आणि शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. चला तर जाणून घेऊया हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 07, 2026 | 05:30 AM
नखांचा रंग फिकट झाला आहे? महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

नखांचा रंग फिकट झाला आहे? महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

हिमोग्लोबिन म्हणजे काय?
हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?
हिमोग्लोबिन का आवश्यक आहे?

दीर्घकाळ निरोगी आणि कायमचउत्साही राहण्यासाठी शरीराला सर्वच पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे हिमोग्लोबिन. हे आपल्या रक्तातील लाल रक्तपेशींमध्ये असते. हिमोग्लोबिन शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करते. पण हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. धावपळीची जीवनशैली, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल आणि अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरात असंख्य बदल होतात. मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्राव, गर्भधारणा, प्रसूती, लोहयुक्त आहाराचा अभाव किंवा गंभीर आजारांची लागण झाल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

व्हेंटिलेटर वरील रुग्णाला नवजीवन! रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या मेहनतीला मिळाले यश

शरीराला लोहाची फार आवश्यकता असते. पण याच मुख्य जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यानंतर महिलांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ज्यामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता सर्वाधिक जाणवते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय पुरेशी झोप घेऊन सुद्धा शरीरात थकवा, अशक्तपणा वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय दैनंदिन जीवनातील साधी काम करताना सुद्धा खूप जास्त थकवा जाणवतो. चेहरा, ओठ, हिरड्या किंवा नखांचा रंग नेहमीपेक्षा फिकट दिसू लागल्यास शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्याचे दिसून येते. अचानक उभं राहिल्यानंतर डोकं हलकं वाटणे किंवा चक्कर येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

First Test Tube Baby: भारतातील ‘ते’ डॉक्टर ज्यांना कधीच श्रेय मिळालं नाही, माहीत आहे का इतिहास?

थोडे चालल्यानंतर, जिने चढल्यानंतर किंवा हलका व्यायाम करताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होते. मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यास वारंवार डोकेदुखी किंवा लक्ष केंद्रित करण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरातील रक्तभिसरण कमी झाल्यानंतर हात पाय थंड पडून जातात. माती, खडू, बर्फ किंवा कच्चा तांदूळ खाण्याची इच्छा होत असेल तर रक्ताच्या कमतरतेमुळे लक्षणे दिसू लागतात. विसराळूपणा, एकाग्रता कमी होणे किंवा सतत गुंगी असल्यास धोकादायक आजार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि आहारात बदल करून हिमोग्लोबिनची कमी झालेली पातळी वाढवावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नखांचा रंग फिकट होणे हे हिमोग्लोबिन कमी असल्याचे लक्षण असू शकते का?

    Ans: होय. नखांचा रंग फिकट होणे हे हिमोग्लोबिन किंवा लोहाच्या कमतरतेचे एक संभाव्य लक्षण असू शकते. मात्र, यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

  • Que: महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, श्वास लागणे, त्वचा व नखे फिकट दिसणे, डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वेगाने धडधडणे अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता का निर्माण होते?

    Ans: मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव, गर्भधारणा, आहारात लोहाची कमतरता, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता आणि काही आरोग्यविषयक समस्या यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.

Web Title: Have your nails turned pale these serious symptoms appear in women suffering from a hemoglobin deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • fruits for hemoglobin
  • Health Care Tips
  • Health Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.