First Test Tube Baby: भारतातील ‘ते’ डॉक्टर ज्यांना कधीच श्रेय मिळालं नाही, माहीत आहे का इतिहास?
भारतातील पहिले आयव्हीएफ डॉक्टर कोण?
आयव्हीएफ म्हणजे काय?
सुभाष मुखर्जी यांच्या मृत्यू मागील कारण?
गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीचा आयुष्यातील नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक महिलेसाठी आई होणं ही भावना अतिशय सुखद आणि मनाला आनंद देणारी भावना आहे. आई होण्याचे सुख प्रत्येक महिलेले अनुभवायचं असतं. गर्भधारणेच्या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. पण काहीवेळा नैसर्गिकरित्या गर्भधारणा नाही झाल्यास डॉक्टर आयव्हीएफ करण्याचा सल्ला देतात. वंध्यत्वावर मात करून गर्भधारणा राहण्यासाठी ही एक वैद्यकीय प्रक्रिया असते. ज्याला सामान्य भाषेमध्ये टेस्ट ट्यूब बेबी असे सुद्धा म्हंटले जाते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्त्रीची स्त्रीबीजे आणि आणि पुरुषाचे शुक्राणू प्रयोगशाळेत मार्गदर्शनाखाली नमुने एकत्र केले जातात. पुरुषाचे वीर्य नमुना गोळा करून त्यातील उत्तम शुक्राणूची निवड केली जाते आणि स्त्रीबीज आणि शुक्राणू लॅबमध्ये एकत्र करून गर्भ तयार केला जातो.त्यानंतर तयार झालेला स्वस्थ गर्भ महिलेच्या गर्भाशयात तज्ज्ञांच्या सल्ल्याने सोडला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला आयव्हीएफ म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – istock)
डॉ. सुभाष मुखर्जी हे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि चिकित्सक होते. त्यांना भारतात आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे जनक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशनचा वापर करून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे टेस्ट ट्यूब बेबी तयार केले होते. मुखर्जी यांनी क्रायोबायोलॉजिस्ट सुनीत मुखर्जी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सरोज कांती भट्टाचार्य यांच्या सहकार्याने हा महत्वपूर्ण इतिहास रचला आणि भारताच्या इतिहासात आपले नाव कोरले. ब्रिटीश डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड्स यांच्यानंतर भारतामध्ये IVF करणारे मुखर्जी हे भारतामध्ये पहिले आणि जगभरात दुसरे डॉक्टर ठरले.
डॉ. मुखर्जी यांच्या योगदानामुळे ३ ऑक्टोबर १९७८ रोजी ‘दुर्गा’चा जन्म झाला. युनायटेड किंगडममधील पहिल्या आयव्हीएफ (IVF) बाळाच्या जन्मानंतर अवघ्या ६७ दिवसांनी एक घटना घडली. ज्यात आयव्हीएफमध्ये मिळालेल्या यशानंतर मुखर्जींना तत्कालीन पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून सामाजिक बहिष्कार आणि अपमानाचा सामना करावा लागला. त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी, त्याच क्षेत्रातील डॉ. टी. सी. आनंद कुमार यांनी त्यांना योग्य ती ओळख मिळवून दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुनीत मुखर्जी यांनी केलेल्या दाव्यात म्हंटले आहे की, सुरुवातीला सुभाष मुखर्जींना ते काय करतात हे कोणालाही कळू द्यायचं नव्हतं, कारण त्यांना IVF प्रयोगाचा परिणाम काय असेल हे माहीत नव्हतं. सुनीत मुखर्जी यांच्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी सरकारी पॅनल तयार करण्यात आले होते. यावेळी समितीने सुभाष मुखर्जी यांच्या विरोधात निकाल देऊन त्यांचा अपमान केला.हा अपमान त्यांना सहन झाला नाही. 19 जून 1981 रोजी त्यांनी कोलकाता येथील राहत्या घरी आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.
Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका
यश म्हणजे केवळ पुरस्कार मिळवणे किंवा इतिहास घडवणे नव्हे, तर एखाद्या अज्ञात नायकाला त्याची रास्त ओळख मिळवून देणे हेच एका खऱ्या माणसाचे खरे यश असते. अत्यंत प्रतिभावान व्यक्तींनाही कधीकधी आव्हानांचा सामना करावा लागतो; तरीही, आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. यशाला कदाचित विलंब होऊ शकतो, परंतु सत्य आणि प्रामाणिकपणाला अखेर मान्यता मिळतेच. याशिवाय त्यांच्या हयातीत त्यांना अपेक्षित असलेला आदर आणि मान्यता मिळाली नाही.
Ans: भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी 'दुर्गा'चा जन्म ३ ऑक्टोबर १९७८ रोजी झाला.
Ans: डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.
Ans: त्यांच्या संशोधनावर सुरुवातीला शंका घेण्यात आली, प्रशासकीय अडथळे आले आणि त्यांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळण्यास अनेक वर्षे लागली.






