Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला जेवढे फायदे होतात तितके तोटे सुद्धा होतात. त्यामुळे अपचनाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी कांदा शिजवून खावा. चला तर जाणून घेऊया कांदा खाण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 08:09 AM
कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:

कांदा खाण्याची योग्य पद्धत?
कांद्यात आढळून येणारे घटक?
कांदा खाल्ल्यामुळे पचनक्रिया का बिघडते?

भारतीय जेवणात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कांद्याचे वापर जेवण बनवताना किंवा तोंडी लावण्यासाठी केला जातो. जेवणाच्या ताटात जर कांदा आणि लिंबू नसेल तर ताट अपूर्णच वाटते. याशिवाय घरात बिर्याणी किंवा इतर चविष्ट पदार्थ बनवल्यानंतर कोशिंबीर किंवा सॅलड बनवले जाते. सॅलडमध्ये काकडी, टोमॅटोसोबतच कच्चा कांदा सुद्धा टाकला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते. पण स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला कांदा केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा गुणकारी मानला जातो. कांद्यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात आणि आहारशास्त्रामध्ये कच्च्या कांद्याला विशेष महत्व आहे.(फोटो सौजन्य – istock)

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

ज्यावेळी कांदा शिजवून किंवा भाजून खाल्ला जातो तेव्हा कांद्यातील आवश्यक घटक नष्ट होऊन जातात. त्यामुळे कांद्याचा शरीराला संपूर्ण फायदा हवा असेल तर कांदा कच्चा खाण्याचा सल्ला दिला जातो. कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. कांदा वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. आज आम्ही तुम्हाला कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कांद्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत.

अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना:

कच्च्या कांद्यात क्वेर्सेटिन नावाचे एक अतिशय शक्तिशाली फ्लॅव्होनॉइड सल्फर संयुगे मुबलक प्रमाणात आढळून येतात. शरीरातील ‘एलडीएल’ म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कांद्याचे सेवन केले जाते. नियमित कच्चा कांदा खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका कमी होऊन जातो. शरीरात वाढलेली जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी कांद्याचे सेवन करावे.

कांदा खाण्याची योग्य पद्धत:

कच्चा कांदा योग्य पद्धतीने न खाल्ल्यास आतड्यांमध्ये इन्फेक्शन वाढू शकते. त्यामुळे कांदा योग्य पद्धतीने खावा. कांदा कायमच खाण्याच्या आधी कापून ठेवावा. १ ते २ तास आधी कापून ठेवलेला कांदा अजिबात खाऊ नये. हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्यातील सक्रिय पोषक घटक नष्ट होऊन जातात आणि बॅक्टेरिया वाढण्याची जास्त शक्यता असते. कांदा खाल्ल्यानंतर काहीवेळा तोंडाला उग्र वास येतो. अशावेळी कांदा खाताना त्यावर लिंबाचा रस, ताजी कोथिंबीर, पुदिना, जिऱ्याची पावडर किंवा दही मिक्स करून खावे. यामुळे तोंडाला वास येत नाही.

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

वारंवार कच्चा कांदा खाल्ल्यास पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे कधीतरी जेवणात कांद्याचे सेवन करावे. आयबीएस, तीव्र गॅस्ट्रायटिस, अल्सर किंवा तीव्र अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी कच्च्या कांद्याचे सेवन करणे टाळावे. अशांनी कांदा शिजवून खावा. यामुळे पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

    Ans: होय, योग्य प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्यास त्यातून फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक घटक मिळू शकतात. मात्र प्रत्येकाची पचनक्षमता वेगळी असते.

  • Que: कच्चा कांदा खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन वाढते का?

    Ans: कच्चा कांदा स्वतःहून पोटातील इन्फेक्शन वाढवतो असे म्हणता येत नाही. मात्र दूषित किंवा नीट न धुतलेला कांदा खाल्ल्यास जंतुसंसर्गाचा धोका वाढू शकतो.

  • Que: कच्चा कांदा खाल्ल्याने गॅस होतो का?

    Ans: काही लोकांना कच्च्या कांद्यातील फ्रुक्टन्स आणि फायबरमुळे गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

Web Title: Eating raw onion good or bad for the body does onion increase the risk of stomach infections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • onion

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.