किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' भयानक लक्षणे
शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार, योग्य प्रमाणात आहार, शारीरिक हालचाली, तणावमुक्त जीवन इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. कारण शरीरात वाढलेला तणाव संपूर्ण शरीराचे कार्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. मात्र धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आहारात पोषक तत्वांची कमतरता, पाण्याचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचते. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करून शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. किडनीसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र हळूहळू लक्षणे दिसू लागतात.
कोरोनानंतर पुन्हा एकदा HKU1 चे थैमान, भारतामध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूमुळे वाढली चिंता
किडनी आतून सडल्यानंतर शरीरात थकवा जाणवणे, चक्कर येणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे किडनी डिटॉक्स असणे आवश्यक आहे. किडनी डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी आतून सडल्यानंतर शरीरात कोणती भयानक लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. कारण किडनीचे कार्य योग्यप्रकारे होत नाही. शरीरामध्ये हानिकारक घटक तसेच साचून राहतात, जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऑक्सिजन आणि पोषकतत्त्वांचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे दिवसभर सुस्तवाल्यासारखे वाटू लागते.
किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर लघवीचा रंग बदल लागतो. लघवीचा रंग गडद होणे, लघवी करताना वेदना होणे, वारंवार लघवीला जावेसे वाटणे किंवा लघवीमध्ये फेसाळपणा दिसणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लघवीमधून रक्त येऊ लागते. किडनी निकामी होण्याची ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष करू नये.
कोणत्याही कारणांशिवाय हातापायांना सूज येत असल्यास याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण असे करणे धोक्याचे ठरू शकते. किडनी खराब झाल्यानंतर हात, पाय, टाच, गुडघे आणि चेहऱ्यावर सूज येते. याशिवाय डोळ्यांखाली सुद्धा सूज आल्यासारखे वाटू लागते.
यकृतासंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, घरगुती उपाय करून आरोग्याची घ्या काळजी
शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा जाणवण्याची शक्यता असते. त्वचेवर पुरळ, खाज किंवा रुक्षता जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किडनीमधील विषारी घाण बाहेर पडून न गेल्यामुळे कोरडेपणा किंवा त्वचा लाल होण्याची समस्या जाणवू शकते.