Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: दोन आठवड्यांपासून खोकला थांबत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा धोका

Persistent Cough in Children: वायुप्रदूषण आणि बदलत्या हवामानामुळे मुलांमध्ये सततचा खोकला व श्वसनाच्या तक्रारी वाढत आहेत. खोकला दीर्घकाळ राहिल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 05:46 PM
photo yandex

photo yandex

Follow Us
Follow Us:
  • वायुप्रदूषणाचा लहान मुलांना फटका
  • सततच्या खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका
  • खोकल्याची ही गंभीर लक्षणे ओळखा
Persistent Cough: बदलते हवामान, वायुप्रदूषण आणि वातावरणातील धुळ यामुळे लहान मुलांमध्ये श्वसनविषयक तक्रारी वाढताना दिसतात. अनेकदा मुलांना होणारा सततचा खोकला हा बदलत्या हवामानाचा किंवा ऋतुमानानुसार होणाऱ्या संसर्गाचा परिणाम असल्याचे समजून पालक त्याकडे दुर्लक्ष करतात.

मात्र, अनेक दिवस खोकला कायम राहणे किंवा वारंवार उद्भवणे ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वायुप्रदूषणासोबतच श्वसनमार्गाचे संसर्ग, अॅलर्जी, दमा आणि इतर आजारांमुळेही मुलांना दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खोकल्यामागील नेमके कारण वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

Diabetes: कॅन्सर रुग्णांनो सावधान! अनियंत्रित डायबिटिजमुळे शस्त्रक्रियेनंतर वाढतो संसर्गाचा धोका; डॉक्टरांचा महत्त्वाचा इशारा

वायुप्रदूषणाचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर

वायुप्रदूषणाचा परिणाम केवळ प्रौढांपुरता मर्यादित नसून लहान मुलांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. मुलांची फुफ्फुसे अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसतात. तसेच प्रौढांच्या तुलनेत त्यांचा श्वास घेण्याचा वेग अधिक असल्याने ते हवेतून अधिक प्रदूषक घटक शरीरात घेतात. वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ, सूक्ष्म धूलिकण आणि धूर यांमुळे श्वसनमार्गाला सूज व जळजळ होऊ शकते. परिणामी खोकला, घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते. विशेषतः दमा किंवा अॅलर्जीचा त्रास असलेल्या मुलांमध्ये ही लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. दुसरीकडे, विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य संसर्गामुळेही खोकला, ताप, नाक चोंदणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

सतत खोकला येण्यामागे गंभीर आजारांचा धोका

मुलांना सतत खोकला येत असेल, त्याचे प्रमाण वाढत असेल किंवा वारंवार होत असेल तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रदूषणामुळे श्वसनमार्गाला त्रास होऊन खोकला, घरघर आणि धाप लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. विशेषतः दमा किंवा अॅलर्जी असलेल्या मुलांमध्ये याचा अधिक परिणाम दिसतो.

मात्र, खोकल्यासोबत ताप, वेगाने श्वास घेणे, छातीत दुखणे, दूध किंवा जेवण न जाणे अथवा असामान्य थकवा जाणवत असल्यास श्वसनमार्गातील संसर्गाचाही विचार करणे गरजेचे आहे. काही वेळा न्यूमोनियाची सुरुवात साध्या सर्दीसारख्या लक्षणांनी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक खोकला प्रदूषणामुळेच होत आहे, असे गृहीत न धरता डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, खोकला किती दिवसांपासून आहे, तो कोणत्या वेळी वाढतो आणि त्यासोबत कोणती लक्षणे दिसतात, यावरून त्यामागील कारणाचा अंदाज येऊ शकतो. विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा खोकला हळूहळू कमी होऊ शकतो, तर प्रदूषणामुळे होणारा त्रास बाहेर गेल्यानंतर किंवा खराब हवेच्या संपर्कात आल्यानंतर वाढू शकतो.

दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला राहिल्यास क्षयरोगासंबंधी तपासणी करावी. छातीचा एक्स-रे आणि काही आवश्यक चाचण्यांद्वारे त्याचे निदान करता येते. मात्र, या सर्व आजारांची लक्षणे काही प्रमाणात सारखी असल्याने पालकांनी स्वतःहून निदान करू नये. वारंवार छातीत घरघर होणे, रात्रीच्या वेळी खोकला वाढणे किंवा सतत खोकला येणे ही दम्याची किंवा अॅलर्जीची लक्षणेही असू शकतात.

मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे येथील वरिष्ठ नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख सांगतात की, मुलांनी जोरजोरात श्वास घेणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ओठ निळसर पडणे, बोलताना किंवा दूध पिताना त्रास होणे अथवा गुंगी येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. मुलांच्या प्रकृतीनुसार डॉक्टर पुढील तपासण्या आणि उपचार सुचवू शकतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय खोकल्याची औषधे, अँटिबायोटिक्स किंवा घरगुती उपचार टाळावे. त्यामुळे योग्य निदान आणि उपचारांना विलंब होऊ शकतो.

मुलांचे श्वसन आरोग्य जपण्यासाठी पालकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. बाहेर पडण्यापूर्वी आपल्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेसंबंधी माहिती घ्यावी. प्रदूषणाची पातळी जास्त असताना मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवणे टाळावे. सिगारेटच्या धुरापासून आणि इतर प्रदूषित वातावरणापासून मुलांना दूर ठेवावे. तसेच वयानुसार आवश्यक लसीकरण वेळेत पूर्ण करावे. हातांची स्वच्छता राखणे आणि पुरेसे पाणी पिण्याची सवय लावणेही महत्त्वाचे आहे.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयतील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. संजय नगरकर म्हणाले की, वाढत्या वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, हवेतील प्रदूषित घटकांमुळे श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो. गेल्या 15 ते 20 दिवसांत आमच्या ओपीडीमध्ये 25 ते 55 वयोगटातील अंदाजे 5 ते 6 प्रौढ, 60 वर्षांवरील 3 ते 4 ज्येष्ठ नागरिक आणि 5 ते 10 वयोगटातील 1 ते 2 लहान मुले सतत खोकला येणे, घशात खवखव होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा लक्षणांसह उपचारासाठी आले आहेत.

प्रदूषित हवेच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊ शकते, ॲलर्जीचा त्रास वाढू शकतो तसेच दमा आणि ब्राँकायटिस यांसारखे आधीपासून असलेले श्वसनाचे आजार अधिक बळावू शकतात. या लक्षणांमुळे अनेकांना झोपेचा त्रास, थकवा आणि शारीरिक हालचालींमध्ये घट जाणवू शकते. तसेच दैनंदिन कामे करणेही कठीण होऊ शकते. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे, हवेची गुणवत्ता खराब असताना घराबाहेर जाणे टाळणे आणि श्वसनाच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब असताना नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावे लागल्यास मास्कचा वापर करावा.

मुलांच्या खोकल्यामुळे त्यांच्या झोपेवर, खाण्यापिण्यावर किंवा दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असेल, तर केवळ तो आपोआप बरा होण्याची वाट पाहू नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास खोकल्याचे कारण प्रदूषण, संसर्ग की अन्य श्वसनविकार आहे, हे ओळखता येते. वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे मुलांच्या विकसित होत फुफ्फुसांचे संरक्षण करण्यास मदत होते,असे डॉ. पारिख यांनी सांगितले.

जेवणानंतर वाढणाऱ्या ग्लुकोजची चिंता मिटणार? ModiCare ने लॉन्च केले ‘ShiftLife Anti-Spike Daily’, ब्रिटिश पोषण विज्ञान आता भारतात

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलांमध्ये सतत खोकला येण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: वायुप्रदूषण, अॅलर्जी, दमा आणि श्वसनमार्गातील संसर्ग ही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: वायुप्रदूषणाचा मुलांच्या फुफ्फुसांवर काय परिणाम होतो?

    Ans: प्रदूषणामुळे श्वसनमार्गाला सूज येऊन खोकला आणि धाप लागू शकते.

  • Que: मुलांमध्ये कोणती लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे?

    Ans: वेगाने श्वास घेणे, छाती आत ओढली जाणे, ओठ निळसर पडणे किंवा गुंगी येणे ही धोक्याची लक्षणे आहेत.

Web Title: Health tips persistent cough in children air pollution respiratory problems pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Air Pollution
  • child
  • Child Health
  • cold and cough home remedies

संबंधित बातम्या

दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज
1

दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज

Children’s Day Wishes: मुलं म्हणजे पाखरांची चपळता…! बालदिनानिमित्त मुलांना द्या गोड आणि प्रेमळ शुभेच्छा
2

Children’s Day Wishes: मुलं म्हणजे पाखरांची चपळता…! बालदिनानिमित्त मुलांना द्या गोड आणि प्रेमळ शुभेच्छा

Home Remedies For Cold : वातावरणातील बदलांमुळे सतत सर्दी खोकला होत असेल तर ‘हे’ उपाय नक्कीच करा, चोंदलेले नाक होईल मोकळे
3

Home Remedies For Cold : वातावरणातील बदलांमुळे सतत सर्दी खोकला होत असेल तर ‘हे’ उपाय नक्कीच करा, चोंदलेले नाक होईल मोकळे

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न
4

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.