बदलत्या हवामानापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी घरगुती उपाय:
बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जनक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे कार्य बिघडते. याशिवाय सकाळच्या वेळी ऊन आणि रात्री वाजणाऱ्या थंडीचा परिणाम शरीरावर होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, विषाणूजन्य ताप, खोकला-सर्दी, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलच्या गोळ्या औषध आणून खाल्या जातात. मात्र नेहमीच मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करणे किडनीसाठी घातक आहे. साथीच्या आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये, म्हणून घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय करून तात्काळ आराम मिळतो.(फोटो सौजन्य – iStock)
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे घसा खवखवणे किंवा आवाजात होणाऱ्या बदलांपासून आराम मिळतो. खोकला किंवा सर्दीची समस्या उद्भवल्यास कोमट पाणी करून प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि घशाच्या वेदना कमी होतात. याशिवाय कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून देखील पिऊ शकता.
घसा खवखवणे किंवा घशाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मधाचे सेवन करावे. यासाठी तुम्ही मधामध्ये हळद मिक्स करून चाटण बनवून खाऊ शकता. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. मधाचे सेवन केल्यामुळे घसा खवखवत नाही. याशिवाय कोमट पाण्यात तुम्ही मध टाकून पिऊ शकता.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म घशातील बॅक्टेरिया नष्ट करतात. घशाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आलं खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन करू शकता. आल्याचा चहा नियमित प्यायल्यास शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळेल. आल्याचा तुकडा चावून खाल्यास खोकला कमी होईल.
आवाज बदलल्यास किंवा घशाचे दुखणे वाढू लागल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे घशातील बॅक्टरीया नष्ट होतात आणि घशाच्या वेदनांपासून आराम मिळतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळतो.
अपचनाची समस्या वाढली आहे? पोटात गॅस झाल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
आयुर्वेदामध्ये जेष्ठ मधला विशेष महत्व आहे. या मधाचे सेवन केल्यामुळे घशातील वेदना कमी होतात आणि आराम मिळतो. बदलत्या वातावरणामुळे तुमचा घसा सतत खवखवत असेल किंवा घशाचे दुखणे वाढल्यास जेष्ठमधाचा एक तुकडा खावा. याशिवाय कोमट पाण्यात जेष्ठमध मिक्स करून तुम्ही पिऊ शकता.