मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पेयांचे करा सेवन:
सर्वच महिलांना महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येतात. या दिवसांमध्ये महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील लगेच दिसून येतो. मासिक पाळी आल्यानंतर शारीरिक आरोग्याकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय महिलांना मासिक पाळी आल्यानंतर पोटात पेटके येणे, कंबर दुखणे, वेदना, पोट फुगणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. काही वेळा या वेदना अतिशय तीव्र असतात. त्यामुळे महिलांनी रोजच्या आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. मासिक पाळी येणे ही शारीरिक प्रक्रिया आहे, मात्र तरीसुद्धा या दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(फोटो सौजन्य – iStock)
अपचनाची समस्या वाढली आहे? पोटात गॅस झाल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
मासिक पाळी आल्यानंतर पहिले दोन किंवा तीन दिवस महिलांना जास्त त्रास होतो. अशावेळी बऱ्याच महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र या दिवसांमध्ये गोळ्या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून पाहावे. हे घरगुती उपाय केल्यास तात्काळ आराम मिळेल. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा चहा प्यावा. या चहाच्या सेवनामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होऊन वेदना कमी होतात. गरम आल्याचा चहा प्यायल्यामुळे गर्भशयात होणाऱ्या वेदना कमी होतात. याशिवाय पोटात येणारे पेटके कमी होऊन आराम मिळतो.
मासिक पाळीमध्ये पोटात येणाऱ्या पेटक्यांमुळे तीव्र वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कॅमोमाइल चहाचे सेवन करावे. हा चहा ट्रँक्विलायझर म्हणून शरीरासाठी काम करते. यामध्ये असलेले घटक प्रोस्टॅग्लॅंडिनची पातळी कमी करून मासिक पाळीमध्ये वेदना निर्माण करणारे हार्मोन्स आहेत. मासिक पाळी आल्यानंतर किंवा मासिक पाळी येण्याआधी तुम्ही या चहाचे सेवन करू शकता.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पुदिन्याच्या चहाचे सेवन केले जाते. यामध्ये असलेले अँटिस्पास्मोडिक गुणधर्म स्नायूंवरील ताण कमी करून पोटात येणाऱ्या पेटक्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. या सर्व वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे.
भारतीय स्वयंपाक घरात दालचिनी हा मसाला उपलब्ध असतो. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीच्या चहाचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. दालचिनीच्या चहाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.