गॅस झाल्यानंतर शरीराच्या कोणत्या अवयवांमध्ये वेदना होऊ लागतात:
रोजच्या आहारात बदल झाल्यानंतर किंवा जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. तेलकट किंवा तिखट पदार्थांचे उपाशी पोटी सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी समस्या जाणवू लागल्यानंतर पोटासोबतच शरीरातील इतर अवयवांना सुद्धा हानी पोहचू लागते. वारंवार ढेकर येणे, उलट्या होणे, जुलाब, मळमळ इत्यादीलक्षणे गॅस झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
पोटामध्ये झालेल्या गॅसमुळे शरीराच्या इतर नसांवर दबाव येतो आणि वेदना होण्यास सुरुवात होते. या वेदना अतिशय तीव्र झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. जास्त तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि थंड सरबत इत्यादी शरीरासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात गॅस होतो. गॅस झाल्यामुळे शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा वेदना होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटात गॅस झाल्यानंतर शरीराच्या कोणत्या अवयवांमध्ये वेदना होऊ लागतात याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पोटामध्ये गॅस झाल्यानंतर छातीमध्ये वेदना होऊ लागतात. या वेदनांमुळे अनेकदा घाबरल्यासारखे वाटू लागते. पोटात गॅस तयार झाल्यानंतर छातीमध्ये वेदना होऊ लागतात. पण वारंवार तुमच्या छातीमध्ये दुखत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. पोटात गॅस वाढल्यानंतर छातीमध्ये वेदना होतात. एवढंच नाहीतर छातीमध्ये जडपणा असल्यासारखे वाटणे किंवा छातीवर दाब आल्यासारखे वाटू लागते. छातीमध्ये जळजळ झाल्यानंतर थंड दुधाचे सेवन करावे.
अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवल्यानंतर प्रामुख्याने पोटात वेदना होऊ लागतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. गॅस झाल्यामुळे पोटावर दाब येऊन सूज येण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठता, अपचन किंवा इतर पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास जिऱ्याचे पाणी किंवा लिंबाचे पाणी प्यावे. याशिवाय पोटदुखी, पेटके इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटात गॅस साचून राहिल्यास गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन करावे, यामुळे पोटातील वायू बाहेर पडून जातो.
वारंवार पाठ दुखीची समस्या उद्भवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्यावे. याशिवाय गॅस झाल्यानंतर देखील पाठीमध्ये वेदना होऊ लागतात. पोटात गॅस तयार झाल्यानंतर पाठीमध्ये दुखणे हे प्रमुख लक्षण दिसून येते. पाठदुखी गॅसमुळे होते. पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
पोटात तयार झालेल्या गॅसमुळे डोकं दुखीची समस्या उद्भवते. कारण पोटात गॅस तयार होतो तेव्हा आजूबाजूच्या अवयवांवर आणि नसांवर दबाव येतो आणि तीव्र वेदना जाणवू लागतात. वारंवार गॅसच्या समस्येने डोकं दुखीची समस्या उद्भवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरात साचून राहिलेल्या गॅसमुळे मानेच्या नसांना देखील हानी पोहचते.