Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
लाल मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी व्हाइट व्हिनेगर हा सर्वात सोप्या आणि प्रभावी उपायांपैकी एक मानला जातो. मुंग्या फिरताना एक विशिष्ट गंध मागे सोडतात, ज्यामुळे त्याच मार्गावरील इतर मुंग्या आकर्षित होतात. व्हिनेगर हा गंध मिटवतो. त्यामुळे मुंग्या वाढत नाही. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये अर्धे पाणी आणि अर्धा व्हाइट व्हिनेगर मिसळा आणि ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी फवारा. दिवसातून एकदा किंवा दोनदा याचा वापर करा.
दालचिनीचा सुगंधांपासून लाल मुंग्या त्यापासून दूर राहतात. त्याच्या तीव्र वासामुळे मुंग्यांना आपला मार्ग बदलावा लागतो. मुंग्यांच्या वाटेवर किंवा बिळांच्या आसपास दालचिनीची पूड शिंपडल्याने मुंग्या येत नाही. याशिवाय, तुम्ही दालचिनीच्या तेलात भिजवलेले कापसाचे गोळेही ठेवू शकता.
लिंबाचा आंबटपणा आणि तीव्र वास मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करतो. ज्या ठिकाणी मुंग्या दिसतात, त्या ठिकाणी लिंबाचा रस शिंपडा. याव्यतिरिक्त, लिंबाच्या सालीचे लहान तुकडे करून किचनच्या कोपऱ्यात ठेवल्यानेही मुंग्या दूर राहण्यास मदत होते. अनेक लोक फरशी पुसताना पाण्यात लिंबाचा रस मिसळूनही वापरतात.
मुंग्यांना दूर ठेवण्याचा एक सोपा उपाय म्हणून मीठाचाही वापर केला जातो. पाण्यात थोडे मीठ मिसळून ते मुंग्यांच्या लाइनमध्ये शिंपडा. काही लोक मिठात बेकिंग सोडा मिसळूनही वापरतात, ज्यामुळे मुंग्या त्या जागेतून निघून जातात.
मुंग्यांना पुदिन्याचा तीव्र वास आवडत नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी मुंग्या जास्त असेल त्या ठिकाणी पुदिन्याची पाने किंवा त्याचे तेल ठेवा. पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब मिसळून शिंपडणे देखील फायदेशीर ठरू शकते.
Parenting Tips: पालकांनो! मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवायचंय? मग आजच करा ‘या’ गोष्टी
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






