Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांना कायमच सुन्नपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण हार्ट स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक सारख्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2026 | 08:03 AM
झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर हात पाय सुन्न का पडतात?
वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे हात पाय सुन्न पडतात?

Health Care Tips: जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. सतत काम, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात सुन्नपणा जाणवतो. तर हातांमध्ये मुंग्या येणे, पायात वेदना होणे, हात पाय सुन्न पडल्यासारखी वाटू लागतात. चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे नसांवर तात्पुरता दबाव पडतो आणि काही वेळात वेदना कमी होतात. पण वारंवार सकाळी उठल्यानंतर शरीरात सुन्नपणा जाणवत असेल तर मणक्याच्या समस्या, कार्पल टनेल सिंड्रोम, मधुमेहामुळे होणारी न्यूरोपॅथी, विटामिन बी १२ ची कमतरता इत्यादी समस्या असू शकतात.(फोटो सौजन्य – istock)

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

एक बाजू सुन्न पडणे, कमजोरी, चेहरा वाकडा होणे किंवा बोलताना अडचण येणेइत्यादी स्ट्रोकसंबंधित लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. तळहातातून किंवा बोटांमधून मुंग्या आल्यासारखे वाटल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केले जाते. शरीरातील नसा मेंदू आणि इतर अवयवांशी जोडलेली असते. या नसा संवेदनात्मक संदेश वाहून नेणाऱ्या नाजूक विद्युत केबल्ससारख्या असतात. ज्यामुळे गाढ झोपेमध्ये हातावर डोके ठेवून झोपल्यास किंवा एकाच कुशीवर दीर्घकाळ झोपल्यामुळे हातांच्या नसांवर जास्तीचा तणाव येतो. डातील रेडियल नर्व्ह आणि कोपऱ्याजवळील ‘अल्नार नर्व्हवर दाब पडल्यामुळे मेंदूकडे जाणारे संदेश तात्पुरते स्थगित होतात.

दररोज सुन्नपणाजाणवण्याची कारणे:

मेंदूकडे वेगाने जाणाऱ्या संदेशांमुळे मुंग्या येणे, उष्णता जाणवणे किंवा टोचल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर मानेच्या मणक्यात नसा दबल्या गेल्यामुळे खांदा, हात आणि बोटांपर्यंत मुंग्या येतात. पाठीच्या खालच्या मणक्यातील वेदनांमुळे नितंब आणि पायांमध्ये सुन्नपणा पसरतो.

मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते. हात-पायांच्या नसा खराब होऊन ‘पेरिफेरल न्यूरोपॅथी’ होते. तसेच विटामिन बी १२ च्या कमतरतेचा परिणाम मणक्यावर आणि शरीरातील नसांवर दिसून येतो. चुकीच्या बसण्या-झोपण्याच्या पद्धतीमुळे किंवा रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे शरीराला रक्तपुरवठा होत नाही. एकाच स्थितीमध्ये जास्त वेळ झोपून राहिल्यास सांध्यांमधील स्नेहद्रव कमी होऊन जातो.

Healthy Vegetable: हृदय निरोगी, हाडे मजबूत अन् मेंदूलाही फायदा! ‘ही’ हिरवी भाजी शरीरासाठी ठरते वरदान

शरीरात दिसणारी धोक्याची लक्षणे कोणती:

शरीराच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होणे, चेहरा एका बाजूला वाकडा होणे, बोलताना शब्द अडखळणे, गोंधळ उडणे, अचानक दिसणे बंद होणे, चक्कर येणे किंवा शरीराचा समतोल जाणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. लघवी किंवा शौचावरील नियंत्रण अचानक सुटणे, तीव्र पाठदुखीसोबत पायातील ताकद कमी होत जाणे, हात किंवा पाय अचानक थंड, फिकट किंवा निळसर पडणे, शारीरिक हालचाल न होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच उपचार करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: झोपेतून उठल्यानंतर हातापायांना सुन्नपणा का जाणवतो?

    Ans: झोपताना हात-पायांवर दबाव आल्यामुळे काही काळ रक्तप्रवाह किंवा नसांवर परिणाम होऊन सुन्नपणा किंवा मुंग्या येऊ शकतात. मात्र हा त्रास वारंवार होत असल्यास इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे.

  • Que: हातापायांना वारंवार मुंग्या येणे कोणत्या समस्येचे लक्षण असू शकते?

    Ans: Vitamin B12 ची कमतरता, मधुमेहाशी संबंधित नसांचे नुकसान, नसांवर दबाव किंवा इतर न्यूरोलॉजिकल कारणांमुळे हातापायांना वारंवार मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवू शकतो.

  • Que: Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हातापायांना सुन्नपणा येतो का?

    Ans: होय. Vitamin B12 ची कमतरता नसांवर परिणाम करू शकते आणि त्यामुळे हात-पायांमध्ये मुंग्या, झिणझिण्या किंवा सुन्नपणा जाणवू शकतो.

Web Title: Healthcare tips do you experience numbness in your hands and feet after waking up do not ignore these symptoms manifesting in your body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • brain stroke
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
1

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
2

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत
3

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
4

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.