भिजवलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
बदाम खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात, हे आपण आजी आजोबा किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून ऐकले आहे. हे खरेच आहे. सकाळी उठल्यावर नियमित ५ ते ६ भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यापासून ते स्मरणशक्ती चांगले राहण्यापर्यंत अनेक फायदे होतात. बदामामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव होतो. सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा कायम टिकून राहते. तसेच दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भिजवलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
भिजवलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
मधुमेह या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी रोजच्या आहारात भिजवलेल्या बदामाचे सेवन करावे. बदामांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, तसेच साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेह किंवा इतर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सुद्धा बदामाचे सेवन करू शकतात.
हे देखील वाचा: पोषक तत्वांनी समृद्ध असलेले मशरूम खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे
बदाम खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. बदामामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. तसेच सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे लवकर भूक लागत नाही. बदाम खाल्ल्याने शरीराला कमी कॅलरी मिळतात. तसेच शरीराला ऊर्जासुद्धा मिळते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात बदामाचे सेवन करावे. बदामामध्ये असलेल्या फायबरमुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचते.यामुळे पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. तसेच आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
हे देखील वाचा: महिलांमध्ये थायरॉईड झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? जाणून घ्या उपाय
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात भिजवलेल्या बदामाचे सेवन करू शकता. बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करते. नियमित बदामाचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळतो.
भिजवलेले बदाम खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटामिन ई युक्त बदाम खाल्ल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. त्वचा रंग सुधरण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बदाम अतिशय प्रभावी आहेत.विटामिन ई त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेल्या बदामाचे सेवन करावे.