पंजाब पुरानंतर श्रेयस अय्यरकडून भावनिक आवाहन(फोटो-सोशल मीडिया)
Shreyas Iyer’s appeal for financial assistance for Punjab flood victims: आयपीएल संघ पंजाब किंग्जचा कर्णधार आणि भारतीय स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडून पंजाब पूरग्रस्त लोकांसाठी मदतीचे आवाहन कडरण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून पंजाबमध्ये भीषण पुराने हाहाकार माजला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत ४३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच वित्त हानी देखील सोसावी लागली आहे. तर १९०० हून अधिक गावे बाधित देखील झाली आहेत. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा : आशिया कपसाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच! Dream11 नंतर कोण आहे नवा प्रायोजक? पहा पहिला लुक..
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, २३ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून सुमारे ३.८४ लाख लोक या आपत्तीमुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित झाले आहेत. अशा कठीण काळामध्ये अय्यरकडून एका व्हिडिओद्वारे संदेश जारी करून लोकांना मदत कार्यात आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रेयस अय्यर म्हटले की, पंजाबने मला दिलेले प्रेम ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. आज पुरामुळे आपल्याला अडचणीत आणले आहे, पण आपण सर्व मिळून त्यातून लवकर बाहेर पडू. तुमचे छोटेसे योगदान देखील एखाद्यासाठी आशेचा किरण बनण्याची शक्यता आहे. आपण सर्व मिळून पंजाबला पुन्हा हसताना पाहूया. असे श्रेयस म्हणाला.
आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जकडून पंजाबमधील विनाशकारी पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी ग्लोबल शीख चॅरिटीच्या भागीदारीमध्ये निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, फ्रँचायझीने जनतेकडून २ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
𝐏𝐮𝐧𝐣𝐚𝐛 𝐤𝐢 𝐡𝐢𝐦𝐦𝐚𝐭 𝐚𝐮𝐫 𝐡𝐚𝐮𝐬𝐥𝐚 𝐮𝐬𝐤𝐢 𝐩𝐞𝐡𝐜𝐡𝐚𝐧 𝐡𝐚𝐢𝐧! 💪
Join Punjab Kings and Global Sikh Charity as we raise funds for those impacted by the floods!
Head to the 🔗 in our bio and make your contributions now.#TogetherForPunjab #PunjabKings pic.twitter.com/Z2ZsUZptKQ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 6, 2025
याआधी पंजाब किंग्जकडून स्वतः ३३.८ लाख रुपये देण्यात आले आहे. या रकमेमधून बचाव बोटी, वैद्यकीय मदत, आवश्यक मदत साहित्य आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बचाव बोटींचा वापर केवळ सध्याच्या आपत्तीच्या परिस्थितीत नाही तर भविष्यात कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनादरम्यान देखील करण्यात येणार आहे.
हेही वाचा : ZIM VS SL : आशिया कपपूर्वी श्रीलंका सराव परीक्षेत नापास! झिम्बाब्वेकडून ५ विकेट्सने स्वीकारावा लागला पराभव
पंजाबमध्ये आतापर्यंतची परिस्थिती खूपच गंभीर आहे. या पुरामुळे १,००० हून अधिक गावे पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहेत, तर ६१,००० हेक्टरपेक्षा जास्त शेती जमीन पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. यामुळे सुमारे १४.६ लाख लोकांना त्यांची घरं सोडून जावे लागले आहे.