पोषक तत्वांचा भंडारा असलेल्या मशरूमचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. निसर्गाकडून मिळालेला सुंदर खजिना म्हणजे मशरूम. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मशरूम उपलब्ध असतात. मशरूमचा वापर करून भाजी, सूप इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये कमी फॅट आणि कमी कॅलरी असतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मशरूमचे सेवन केले जाते. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले मशरूम खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मशरूम खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
मशरूममध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात, जे खाल्ल्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होते.
मशरूममध्ये कोलेस्टेरॉल आणि सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
मधुमेह, अल्झायमर, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात मशरूमचा समावेश करावा.
फायबरने समृद्ध असलेले मशरूम आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करावा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.