Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Attack: गॅस-अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका! महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी; ‘हे’ संकेत ओळखा

Heart Attack Symptoms In Women's: महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात, ही लक्षणे पुरुषांपेक्षा किती वेगळी असतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 02, 2026 | 06:16 PM
Heart Attack Symptoms In Women

Heart Attack Symptoms In Women

Follow Us
Follow Us:
  • हार्ट अटॅकचा धोका महिलांनाही
  • महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी?
  • ‘हे’ संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका

हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. परंतु, महिलांनाही  हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. मात्र त्यांची लक्षणे अनेकदा पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. त्यामुळे अचानक जाणवणारा थकवा, मळमळ, अपचन, चक्कर, श्वास घेण्यास त्रास किंवा अस्वस्थता याकडे सामान्य आजार किंवा गॅस-अॅसिडिटी म्हणून दुर्लक्ष केले जाते. काही वेळा ही लक्षणे सौम्य असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. मात्र हृदयविकाराच्या झटक्यात उपचारासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. विशेषतः सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणे खूप सौम्य असू शकतात किंवा लक्षातही येत नाहीत. त्यामुळे शरीरात अचानक किंवा असामान्य बदल जाणवल्यास त्याकडे लक्ष देणे आणि आवश्यक असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कोणती वेगळी लक्षणे दिसतात, जाणून घेऊयात.

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे

महिलांमध्येही छातीच्या मध्यभागी दाब, जडपणा, किंवा वेदना होणे हे हृदयविकाराचे महत्त्वाचे संकेत आहेत. सतत किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या छातीतील अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू नये.

श्वास घेण्यास त्रास

छातीत वेदना नसतानाही अचानक धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे अशा त्रासाकडे केवळ थकवा म्हणून पाहू नये.

असामान्य थकवा आणि अशक्तपणा

नेहमीच्या कामानंतर होणाऱ्या थकव्यापेक्षा वेगळा, अचानक किंवा असामान्य स्वरूपाचा थकवा जाणवणे हे महिलांमध्ये दिसणारे धोक्याचे लक्षण असू शकते. काही वेळा हा संकेत इतर लक्षणांपेक्षा आधीही जाणवू शकतो.

मळमळ, अपचन आणि पोटात अस्वस्थता

मळमळ, उलट्या, अपचन किंवा पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता यांसारखी लक्षणेही हृदयविकाराच्या झटकाच्या वेळी दिसू शकतात. त्यामुळे वारंवार किंवा अचानक अशी लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अनेकदा याकडे गॅस किंवा अपचन समजून दुर्लक्ष केले जाते.

पाठ, मान, जबडा किंवा हातात वेदना

हार्ट अटॅकचा त्रास केवळ छातीपुरता मर्यादित नसतो. एका किंवा दोन्ही हातांसह पाठ, मान, खांदा किंवा जबड्यात वेदना  जाणवत असेल तर हे देखील महत्वाचे लक्षण आहे.

चक्कर येणे आणि थंड घाम फुटणे

अचानक चक्कर येणे, अशक्तपणा किंवा थंड घाम येणे ही देखील धोक्याची लक्षणे असू शकतात.

सायलेंट हार्ट अटॅक का धोकादायक?

सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणे सौम्य असल्याने व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळू शकत नाही. काही प्रकरणांत नंतर ईसीजी किंवा इमेजिंग तपासणीदरम्यान त्याचे निदान होते.

लक्षणे जाणवल्यास काय करावे?

अचानक छातीत अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम, मळमळ, चक्कर किंवा शरीराच्या वरच्या भागात वेदना यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. हृदयविकाराचा झटक्याची कोणतीही लक्षणे दिसत असल्यास असल्यास स्वतः निदान करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम

Web Title: Heart attack symptoms in women signs not to ignore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • heart attack
  • Heart attack prevention
  • Symptoms
  • women health

संबंधित बातम्या

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
1

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.