
काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! 'या' पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
Hibiscus Flower For Face: गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या स्वागताची मोठ्या जलौषात तयारी केली जात आहे. याशिवाय सणावारांच्या दिवसांमध्ये त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. फेशिअल, क्लीनअप, ब्लिच इत्यादी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे चेहऱ्यावर तात्पुरता ग्लो दिसतो आणि पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवरील ग्लो कायम टिकून राहतो आणि चेहऱ्यावरील समस्या कमी होतात.(फोटो सौजन्य – AI)
साखर त्वचेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या गोडधोडाच्या ग्लोरिफिकेशनचे हे कटू सत्य
गणपती बाप्पाला जास्वदींचे फुल खूप प्रिय आहे. बाप्पाच्या पूजेसाठी जास्वदींची फुले वापरली जातात. या फुलाला केवळ धार्मिक महत्व नसून त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवलेले जेल त्वचेवरील ग्लो वाढवण्यास मदत करेल. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून सुंदर आणि ग्लोइंग करेल. त्यामुळे बाजारातील महागडे स्किन केअर वापरण्याऐवजी जास्वदींच्या फुलांचा जेल त्वचेसाठी वापरावा. यामुळे रुक्ष आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळेल.
जास्वदींच्या फुलांचा जेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, जास्वदींची फुले पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात जास्वदींची फुले घालून बारीक पेस्ट बनवा. तयार केलेल्या पेस्टमध्ये कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट काचेच्या डब्यात भरून नियमित रात्री चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळते. चेहेऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी जास्वदींच्या फुलांपासून बनवलेला जेल त्वचेवर लावल्यास महिनाभरात बदल दिसून येईल.
जास्वंदाचे जेल त्वचेला मॉईश्चराईज करण्यास मदत करते. याशिवाय त्वचेची काळजी घेण्यासाठी पोषक आहार, भरपूर पाण्याचे सेवन आणि नियमित सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे. जास्वदींच्या फुलांचा वापर केवळ त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठी सुद्धा करावा. जास्वदींच्या फुलांचा रस काढून खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून केसांवर लावल्यास केस मजबूत आणि घनदाट होतील.
Ans: जास्वंदीमध्ये काही अँटिऑक्सिडंट आणि वनस्पतीजन्य संयुगे आढळतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी जास्वंदीपासून तयार केलेले जेल वापरले जाते.
Ans: ताजी जास्वंदीची फुले स्वच्छ धुऊन त्यांची पाकळी बारीक करून त्यात योग्य बेस जेल, जसे की शुद्ध अॅलोव्हेरा जेल, मिसळता येते. मिश्रण स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवावे आणि खराब होण्याची लक्षणे दिसल्यास वापरू नये.
Ans: त्वचेला ते मानवत असल्यास कमी प्रमाणात वापरता येऊ शकते. मात्र प्रथम हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य आहे.