त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? 'या' पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
Skin Care Tips: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम जसा शरीरावर दिसून येतो, तसाच परिणाम त्वचेवर सुद्धा दिसून येतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, फोड, मुरूम आणि सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य नष्ट करून टाकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. चेहऱ्यावर पिंपल्स वातावरणातील बदलांमुळेच नाहीतर हार्मोन्समधील बदल, ताणतणाव, अपुरी झोप, चुकीचा आहार किंवा स्किनकेअरमध्ये केलेल्या चुकांमुळे सुद्धा येतात. त्वचा निस्तेज झाल्यानंतर ती पुन्हा एकदा चमकदार करण्यासाठी वेगवेगळे स्किन केअर रुटीन, महागडे प्रॉडक्ट, स्किन ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स नेमके कशामुळे येतात हे समजून घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
स्किन केअर रुटीन किंवा महागड्या प्रॉडक्टचा वापर करून चेहऱ्यावरील डाग निघून जातात. पण शरीरात होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे त्वचेवर पुन्हा एकदा पिंपल्स येतात आणि त्वचा निस्तेज होऊन जाते. हार्मोनल बदल, मासिक पाळी, गर्भावस्थेत, पेरिमेनॉपॉज किंवा PCOS यांसारख्या स्थितीमध्ये शरीरात ॲन्ड्रोजन संप्रेरकांचे प्रमाण वाढते आणि त्वचेवरील तेल ग्रंथी सक्रिय होतात. मृत पेशी आणि बॅक्टेरियासोबत एकत्र आल्यामुळे त्वचेची छिद्र बंद होऊन जातात. हार्मोनल बदलांमुळे हनुवटी आणि गालाच्या खालच्या भागात पिंपल्स येतात.
सर्वच महिला त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. चेहऱ्यावर वाढलेला तेलकटपणा किंवा टॅनिंग घालवण्यासाठी वारंवार स्क्रब लावून त्वचा घासली जाते. स्क्रब लावून त्वचा सतत घासल्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक संरक्षक थर नष्ट होऊन जातो, ज्याच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त तेलकट होते. याशिवाय झोपण्याआधी मेकअप न काढणे, जास्त तेलकट किंवा हेव्ही कॉस्मॅटिक्स वापरणे, केसांचे तेल चेहऱ्यावर लावणे, पिंपल्सना वारंवार हात लावणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता असते.
Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर आणि त्वचेवर दिसून येतो. हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ, गोड पेये, रिफाइंड कार्ब्स आणि प्रक्रिया केलेले अन्न इत्यादी पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि त्वचा निस्तेज, काळी पडून जाते. पण चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित भरपूर पाणी, पोषक आहार आणि पुरेशी झोप घेणे फार गरजेचे आहे.
Ans: हार्मोन्समधील बदल, ताण, झोपेचा अभाव, त्वचेवर जास्त तेलकटपणा, काही कॉस्मेटिक्स आणि काही व्यक्तींमध्ये आहारातील घटक यामुळे पिंपल्स वाढू शकतात.
Ans: दाहयुक्त किंवा खोलवरचे पिंपल्स त्वचेतील कोलेजनला नुकसान करू शकतात. त्यामुळे पिंपल्स बरे झाल्यानंतर काही जणांच्या चेहऱ्यावर खोलगट किंवा खड्ड्यासारखे अॅक्ने स्कार्स दिसू शकतात.
Ans: काही लोकांमध्ये उच्च ग्लायसेमिक पदार्थ, जास्त साखर असलेले खाद्यपदार्थ आणि काही दुग्धजन्य पदार्थ अॅक्ने वाढवण्याशी संबंधित असू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते.






