झोपताना कोणत्या कुशीवर झोपल्यास हृदयावर येतो ताण? उद्भवू शकतो हार्ट अटॅक
निरोगी आरोग्यासाठी शांत झोप लागणे आवश्यक आहे. शांत झोपेमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे नियमित ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. मात्र काहीवेळा कामाच्या तणावामुळे रात्री झोपण्यास उशीर होतो. तरअनेकांना रात्रीच्या वेळी उशिरा पाहण्याची सवय असते, त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. निरोगी आरोग्यासाठी दिवसभराची दीनचार्य निरोगी आणि चांगली असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराच्या कार्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. आपल्यातील अनेकांना रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर कधी उजव्या कुशीवर झोपण्याची सवय असते, तर कधी डाव्या कुशीवर झोपण्याची सवय असते. सतत वेगवेगळ्या कुशीवर झोपल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण होतात.(फोटो सौजन्य – iStock)
आंब्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं! जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ
चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण बरोबर होत नाही. याशिवाय ह्रदय, पचनक्रिया आणि संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होतात. हृद्यासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी योग्य कुशीवर झोपणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात धक्कादायक बदल दिसून येतात. चुकीच्या कुशीवर झोपल्यामुळे छातीत जडपणा, अपचन, थकवा, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपल्यानंतर कोणत्या कुशीवर झोपावे? कोणत्या कुशीवर झोपल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर अनेक लोक कोणत्याही कुशीवर झोपतात. पण असे न करता डाव्या कुशीवर झोपल्यास हृदयावरील ताण कमी होईल आणि रात्री झोप चांगली लागेल. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर लसिका प्रणाली आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याशिवाय हृदयावर वाढलेला ताण कमी होतो. याशिवाय गर्भवती महिलांनी नेहमी झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. यामुळे गर्भाला आणि गर्भाशयाला जास्त ऑक्सिजन पुरवठा होतो.
पाठीवर झोपल्यामुळे पोजिशन श्वसनमार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. याशिवाय शरीराच्या हालचालींमध्ये बदल होण्याची शक्यता असते. पाठीवर झोपल्यामुळे घोरणे किंवा काही वेळा श्वास थांबण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीवर चुकूनही झोपू नये. पाठीवर झोपल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
रात्रीच्या वेळी डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. तसेच अॅसिड रिफ्लक्स होण्याची समस्या कमी होऊन जाते. पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नेहमी डाव्या कुशीवर झोपावे. अपचन, जळजळ इ=इत्यादी समस्या कमी होतात.