Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High BP at 30: तरुण वयातही वाढतोय High BP! 30 नंतर ‘इतक्या’ वेळा नक्की तपासा रक्तदाब

High BP at 30: वयाच्या 30व्या वर्षीही हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो आणि अनेकदा त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. लेखानुसार, गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलचे डॉ. गगनदीप एस यांनी तरुण आणि दिसायला फिट असलेल्या व्यक्तींमध्येही BP वाढलेला आढळत असल्याचे सांगितले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 25, 2026 | 03:30 PM
30: तरुण वयातही वाढतोय High BP! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

30: तरुण वयातही वाढतोय High BP! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 30च्या वयातही BP वाढू शकतो.
  • जास्त मीठ, फास्ट फूड, अपुरी झोप आणि स्ट्रेस
  • नियमित BP तपासा
 

मी एकदम फिट आहे, मला कसला BP? असं जर तुम्ही वयाच्या 30 मध्ये विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता डॉक्टर सांगतायत की 30 वर्षाच्या तरुणांमध्ये पण हाय ब्लड प्रेशर खूप वाढला आहे.  High BP at 30:

सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे याची काही लक्षणं पण दिसत नाहीत.गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलचे हार्टचे मोठे डॉक्टर डॉ. गगनदीप एस यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणतात हाय BP ची सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की हा आजार काहीच लक्षण दाखवत नाही.

काहीच त्रास होत नाही पण आतून नुकसान होतंय

अनेकांना वाटतं BP वाढला की छाती दुखेल, धाप लागेल. पण तसं काहीच होत नाही. माणूस दिवसभर नॉर्मल काम करत असतो, त्याला वाटतं मी एकदम ओके आहे. पण आतमध्ये त्याच्या रक्तवाहिन्यांवर हळूहळू परिणाम होत असतो. हृदयाला प्रत्येक ठोक्याला जास्त जोर लावावा लागतो, नसा कडक व्हायला लागतात.म्हणूनच डॉक्टर हाय BP ला सायलेंट किलर म्हणतात. म्हणजे शांतपणे मारणारा आजार. बाहेर काही दिसत नाही पण आतून तो शरीर पोखरत असतो.

30 वर्षाच्या तरुणांमध्ये का वाढतोय BP?

डॉ. गगनदीप सांगतात की आता आमच्याकडे 30-32 वर्षाची मुलं येतात, दिसायला एकदम फिट, जिमला जाणारी, ऑफिसला जाणारी, पण चेक केलं तर BP वाढलेला असतो. काहींना तर गोळ्या पण सुरू कराव्या लागतात.

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया

मग याचं कारण काय? तर आपली लाईफस्टाईल. दिवसभर लॅपटॉप समोर बसणं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणं, झोपच नीट नाही, जेवणात मीठ जास्त, बाहेरचं फास्ट फूड, पॅकेटमधलं खाणं, कामाचा स्ट्रेस. या सगळ्यामुळे लहान वयातच BP वाढायला लागतो.BP एका दिवसात वाढत नाही. तो हळूहळू काही महिन्यात, वर्षात वाढत जातो. त्यामुळे आपल्याला कळतच नाही. पण जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. जर वेळेत लक्ष नाही दिलं तर पुढे जाऊन हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी खराब होण्याचा मोठा धोका असतो

30 वय असेल तर BP किती वेळा चेक करायचा?

अनेकांना वाटतं BP तर 50 नंतर चेक करायचा असतो. पण हे चुकीचं आहे. तुम्ही 30 चे जरी असाल तरी BP चेक करणं खूप गरजेचं आहे.डॉक्टर सांगतात की 30 वर्षाच्या व्यक्तीने वर्षातून कमीत कमी 5 ते 10 वेळा तरी BP तपासला पाहिजे. BP तपासायला फक्त 2 मिनिटं लागतात. पण त्यामुळे तुम्हाला आधीच कळू शकतं की काही प्रॉब्लेम आहे का.

एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा BP जास्त आला म्हणजे लगेच तुम्हाला हाय BP चा आजार आहे असं नाही. कधी कधी टेन्शनने पण BP वाढतो. त्यामुळे एक-दोन आठवडे रोज चेक करा, जर सारखा जास्त येत असेल तरच डॉक्टरला भेटा.

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

BP पासून लांब राहायचं असेल तर काय करायचं?

BP पासून लांब राहायचं असेल तर काय करायचं?यासाठी काही मोठं करायची गरज नाही, फक्त रोजच्या सवयी बदला.सगळ्यात आधी खाणं सुधारा. बाहेरचं जास्त मीठ असलेलं खाणं, फास्ट फूड, चिप्स, कुरकुरे हे कमी करा. घरी बनवलेलं साधं जेवण खा.दुसरं म्हणजे चालायला लागा. दिवसभर बसून नका राहू. रोज कमीत कमी 2 ते 3 हजार पावलं तरी चाला. जिम नाही जमलं तरी चालणं तरी करा.

झोप खूप महत्वाची आहे. रोज 6 ते 8 तास शांत झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत बसू नका.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस कमी करा. कामाचा ताण घेऊ नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा.वय 30 आहे म्हणजे तुम्ही म्हातारे नाही झालात, पण शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करण्याचं हेच योग्य वय आहे. आजच BP चेक करून बघा.

Web Title: High bp at 30 hypertension symptoms blood pressure check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • helathy lifestyle
  • lifestlye
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया
1

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
2

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.