
खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात 'या' सवयी
Knee Pain: पूर्वीच्या काळी व्य वाढल्यानंतर शरीराला आजारांची लागण व्हायची. पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे तरुण वयातच गंभीर आजार होऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बऱ्याचदा खालीवर पायऱ्या उतरताना किंवा चढताना गुडघ्यांमधून कटकट आवाज येतो आणि गुडघ्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. आवाजासोबतच वेदना, सूज, सांधा अडकणे किंवा चालताना गुडघा अस्थिर वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला गुडघ्यामधील ग्रीस कमी होण्यास कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
गुडघ्यांमधून वेगवेगळ्या कारणांमुळे आवाज येऊ शकतो. गुडघा दुमडताना किंवा सरळ करताना सांध्यांच्या हाडांवरून लिगामेंट सरकल्यामुळे कट-कट असा आवाज येऊ लागतो. याशिवाय दोन हाडांमधील गादीसारख्या मऊ उतीमध्ये वयानुसार किंवा झिजोऱ्यामुळे अनेक बदल होतात. या बदलांच्या परिणामामुळे सांध्यातील द्रवाची गुणवत्ता बदलते आणि सांध्यांमधून कटकट आवाज येऊ लागतो. वयाच्या ३० किंवा ४० व्या वर्षीसुद्धा सांध्यातील ग्रीस संपून जाते.
गुडघ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली, व्यायाम करणे फार आवश्यक आहे. मांडी आणि नितंबाच्या स्नायूंना बळकट व्यायाम केल्यास गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते. व्यायाम करताना योग्य तंत्र वापरावे, ज्यामुळे वेदना कमी होतात आणि गुडघ्यांचे आरोग्य चांगले राहते. पण जर तुमचे वजन जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे फार आवश्यक आहे.
वारंवार गुडघ्यांमधून कटकट आवाज येत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय नियमित व्यायाम, फिजियोथेरपी, वजनाचे व्यवस्थापन आणि इतर बिगर-शस्त्रक्रिया उपचारांद्वारे गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळवू शकता. हाडांमधील कमी झालेले कॅल्शियम वाढवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. वेदना, सूज, सांधा अडकणे किंवा अस्वस्थता जाणवत कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
सांध्यातील नष्ट झालेले द्रव पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी कोणतेही पेय किंवा अन्नपदार्थ उपलब्ध नाहीत. संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास गुडघे कायमच निरोगी राहण्यास मदत होते. वजन वाढल्यानंतर संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर येतो. त्यामुळे वाढलेल्या वजनाचे योग्य व्यवस्थिपन करणे आवश्यक आहे.
Ans: गुडघ्यांमधून आवाज येण्यामागे सांध्यातील वायूचे बुडबुडे, टेंडन्सची हालचाल किंवा सांध्याच्या पृष्ठभागातील बदल अशी विविध कारणे असू शकतात. वेदना किंवा सूज नसल्यास हा आवाज अनेकदा गंभीर नसतो.
Ans: नाही. केवळ आवाज येण्यावरून गुडघ्यांमधील सायनोव्हियल द्रव म्हणजेच सांध्याचे नैसर्गिक वंगण कमी झाले आहे, असे म्हणता येत नाही. योग्य निदानासाठी इतर लक्षणेही तपासावी लागतात.
Ans: अतिरिक्त वजन, व्यायामाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे, गुडघ्यांना झालेली दुखापत आणि स्नायूंची कमकुवत ताकद यांमुळे गुडघ्यांवर ताण येऊ शकतो.