भारतात किंवा अन्य देशातील हिंदू धर्मातील व्यक्तींना मुलाचे नाव ठेवणे हा नक्कीच एक मोठा सोहळा असतो. या नामकरण सोहळ्यादरम्यान जन्म झालेल्या मुलाची जन्मतारीख आणि वेळेच्या आधारे मुलाच्या नावाचे पहिले अक्षर निवडले जाते आणि नंतर त्याच अक्षराने मुलाचे नाव ठेवले जाते. जर तुम्हाला मुलगा असेल आणि त्याचे नाव ‘ह’ या आद्याक्षराने सुरू होत असेल, तर या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या बाळासाठी अनेक अर्थपूर्ण हिंदू नावे आढळतील.
या लेखात, मुलांसाठी ‘H’ ने सुरू होणारी काही हिंदू नावे आम्ही दिली आहेत. या नावांसोबतच त्यांचा अर्थही देण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे नाव निवडणे सोपे जाईल. त्यामुळे वेळ न दवडता आपण लहान मुलांच्या हिंदू नावांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Canva)
ह अक्षरावरून मुलांची नावे
‘ह’ या आद्याक्षरावरून अत्यंत सुंदर आणि रॉयल तशीच युनिक अशी नावे आपल्याला मिळू शकतात. ‘हृदयेश’, ‘हृतिक’ आणि ‘हृतेश’ ही त्यापैकी काही युनिक नावे आहेत. हृदयेश म्हणजे हृदयाचा राजा आणि हृदयाचा स्वामी. हृतिक हे एका वृद्ध ऋषीचे नाव आहे ज्याचा अर्थ हृदयाचा स्वामी असा आहे. हृतेशचा अर्थ सत्याचा स्वामी असा होतो. ही तिन्ही नावं अतिशय अभूतपूर्व अशी आहेत.
ह वरून मुलांच्या नावाची यादी
मुलांची नावे | अर्थ |
हृिदान | हृदय, आत्मा, दयाळू असणारा |
हितांश | दुसऱ्यांना आनंद देणारा, दुसऱ्याचे हित साधणारा |
हृिहान | देवाच्या अधिक जवळचा, शत्रूंचा विनाश करणारा |
हर्षिल | अत्यंत आनंदी, आनंद वाटणारा मुलगा |
हितार्थ | दुसऱ्याचे हित करणारा, प्रेम |
हीर | प्रेमळ, बलशाली, शक्तीशाली |
हरिश्व | विष्णू आणि शिवाचे नाव |
हेताक्ष | प्रेमाचे अस्तित्व दर्शविणारा |
हिमांशु | चंद्र, चंद्राच्या नावांपैकी एक |
हरण्याक्ष | शिवाच्या नावापैकी एक, सिंहाचा डोळा |
ह वरून हृदयाशी संबंधित नाव
ह या अक्षराशी निगडीत हृदयाशी संबंधित काही नावे पाहूया. हृदयांशू, हृदयांश आणि ह्रदिक अशी नावेही आहेत. या नावांच्या अर्थाबद्दल जाणून घेऊया. हृदयांशू म्हणजे हृदयातून प्रकाश, हृदयांश म्हणजे हृदयाचा तुकडा आणि हृदिका म्हणजे हृदयाचा स्वामी, प्रिय आणि वास्तविक. या तिघांमधून तुम्ही कोणतेही एक नाव निवडू शकता.