Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

१९६० च्या दशकात स्टॅन ली यांनी सर्वसामान्य तरुणाच्या समस्या मांडणाऱ्या 'स्पायडर-मॅन' या आगळ्यावेगळ्या पात्राची निर्मिती केली. सुरुवातीचा विरोध डावलून चित्रकार स्टीव्ह डिटको यांच्या मदतीने तयार केलेले हे पात्र १९६२ मध्ये कॉमिक्सद्वारे प्रसिद्ध झाले आणि जागतिक पातळीवर तुफान लोकप्रिय ठरले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 12, 2026 | 12:00 PM
‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
Follow Us
Follow Us:
  • स्टॅन ली यांनी १९६० च्या दशकात सर्वसामान्य तरुणाच्या समस्या मांडणाऱ्या एका नव्या सुपरहिरो ‘स्पायडर-मॅन’ ची संकल्पना मांडली होती.
  • सुरुवातीला प्रकाशकांनी विरोध दर्शवला, तरीही स्टॅन ली आणि चित्रकार स्टीव्ह डिटको यांनी हे पात्र कॉमिक्समध्ये यशस्वीपणे डिझाइन केले.
  • ऑगस्ट १९६२ मधील पहिल्याच कॉमिक्स पदार्पणापासून स्पायडर-मॅन हे पात्र जगभरातील पॉप-कल्चरचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनले.

जगभरातील पोराठोरापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या  मनावर राज्य करणारा ‘स्पायडर-मॅन’ हा मार्व्हल कॉमिक्सचा आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरो मानला जातो. मात्र, एका सामान्य हायस्कूल मुलाच्या रूपात या अद्भूत पात्राची निर्मिती कशी झाली, याचा इतिहास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे.

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला मार्व्हल कॉमिक्सचे लेखक आणि संपादक स्टॅन ली एका नव्या सुपरहिरोच्या शोधात होते. त्या काळातील कॉमिक्समध्ये बहुतांश तरुण पात्रांना केवळ मुख्य सुपरहिरोचे साहाय्यक म्हणून दाखवले जायचे. स्टॅन ली यांना असा एक तरुण नायक हवा होता, ज्याला सर्वसामान्यांप्रमाणे स्वतःचे वैयक्तिक प्रश्न, आर्थिक अडचणी आणि भावनिक संघर्ष असतील. असे म्हटले जाते की, भिंतीवर सरपटणाऱ्या एका कीटकाला पाहून स्टॅन ली यांना कोळ्याच्या शक्ती असलेला हिरो बनवण्याची कल्पना सुचली.

Spider Man Movie Review : टॉम हॉलंडचा ‘स्पायडर-मॅन’ ठरला सुपरहिट? सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया

त्यांनी या पात्राचे नाव ‘स्पायडर-मॅन’ ठेवले आणि त्याची मुख्य ओळख पीटर पार्कर ही एक अनाथ तरुण मुलगा म्हणून तयार केली. सुरुवातीला मार्व्हलचे प्रकाशक मार्टिन गुडमन यांनी ही कल्पना स्पष्टपणे फेटाळून लावली होती. “लोकांना कोळ्यांची भीती वाटते आणि कोळी कोणालाच आवडत नाही,” असा तर्क गुडमन यांनी दिला होता.

मात्र, स्टॅन ली यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रसिद्ध चित्रकार स्टीव्ह डिटको यांच्यासोबत मिळून या पात्राचे स्केच आणि डिझाईन तयार केले. स्टीव्ह डिटको यांनीच स्पायडर-मॅनचा लाल आणि निळ्या रंगाचा प्रसिद्ध सूट, तोंडावरचा पूर्ण मास्क आणि हातातील ‘वेब-शूटर्स’ डिझाइन केले.

अखेर ऑगस्ट १९६२ मध्ये ‘अमेझिंग फँटसी #१५’ कॉमिक बुकमध्ये स्पायडर-मॅनने पहिल्यांदा पदार्पण केले. हे कॉमिक बुक बाजारात येताच तुफान हिट झाले आणि वाचकांनी या नव्या हिरोला डोक्यावर घेतले.

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

‘With great power comes great responsibility’ या ब्रीदवाक्याने पीटर पार्करच्या प्रवासाला एक नवी दिशा दिली. त्यानंतर १९६३ मध्ये स्पायडर-मॅनचे स्वतःचे स्वतंत्र कॉमिक्स ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’ सुरू झाले. आज कॉमिक्स, टीव्ही शो, व्हिडिओ गेम्स आणि हॉलीवूड चित्रपटांच्या माध्यमातून स्पायडर-मॅन जागतिक पॉप-कल्चरचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

Web Title: History of spider man concept stan lee marvel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • entertainment
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ…! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू
1

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ…! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध
2

पालकांनो सावधान! मुलींमध्ये कमी वयात पाळी येण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण! जाणून घ्या मांसाहार आणि हार्मोन्सचा संबंध

तुम्ही दिवसभराच्या आहारातून किती कॅलरीज घेता? वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आहे नेमके कॅलरी इनटेकचे गणित! समजून घ्या
3

तुम्ही दिवसभराच्या आहारातून किती कॅलरीज घेता? वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आहे नेमके कॅलरी इनटेकचे गणित! समजून घ्या

हातावरील मेहंदीचा रंग हवा गडद आणि उठावदार? मग नक्की ट्राय करा ‘या’ घरगुती टिप्स
4

हातावरील मेहंदीचा रंग हवा गडद आणि उठावदार? मग नक्की ट्राय करा ‘या’ घरगुती टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.