Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोगाविरोधातील लढ्याला नवी दिशा! HNCII च्या देशव्यापी मोहिमेची गोरखपूरमधून सुरुवात

HNCII Cancer Awareness Campaign: HNCIIने डोके व मानेच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार यासाठी सुरू केलेल्या देशव्यापी मोहिमेअंतर्गत गोरखपूरमध्ये दोन दिवसीय संवादात्मक उपक्रमाचे आयोजन केले

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 05:23 PM
कर्करोगाविरोधातील लढ्याला नवी दिशा! HNCII च्या देशव्यापी मोहिमेची गोरखपूरमधून सुरुवात
Follow Us
Follow Us:
  • कर्करोगाचे लवकर निदान अन् वेळेवर उपचार
  • HNCIIच्या देशव्यापी मोहिमेची गोरखपूरमधून सुरुवात
  • कर्करोगाविरोधातील लढ्याला नवी दिशा
डोके व मानेच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार यासाठी देशव्यापी नागरिक चळवळीचा शुभारंभ केल्यानंतर Head & Neck Cancer Institute of India (HNCII)ने या मोहिमेची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून HNCIIचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुलतान ए. प्रधान यांनी २२ आणि २३ ऑगस्ट रोजी गोरखपूर येथे दोन दिवसीय संवादात्मक उपक्रमाचे नेतृत्व केले. या माध्यमातून पूर्व उत्तर प्रदेशातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने वंचित भागांमध्ये दर्जेदार आणि वेळेवर कर्करोग उपचारांची उपलब्धता वाढविण्यासाठी स्थानिक आरोग्यसेवा व्यावसायिक आणि संबंधित भागधारकांना एकत्र आणण्यात आले.

कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला ठरेल गेमचेंजर

या उपक्रमात समान ध्येय असलेले भागीदार, आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक सेवा संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. रुग्णांना कर्करोग उपचार मिळवताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली तसेच प्रादेशिक कर्करोग उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले.

चर्चेदरम्यान लवकर निदान, क्षमता विकास आणि सहकार्यावर आधारित उपचार पद्धती यावर विशेष भर देण्यात आला. स्थानिक वैद्यकीय नेटवर्क अधिक मजबूत करून रुग्णांना त्यांच्या घराजवळच तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या गरजेवरही चर्चा झाली. गोरखपूरमधील हा उपक्रम HNCIIच्या व्यापक प्रयत्नांमधील पहिले पाऊल ठरले आहे. तज्ज्ञ वैद्यकीय ज्ञान स्थानिक आरोग्यसेवा पुरवठादार आणि समुदायातील संबंधित घटकांशी जोडून कर्करोग उपचारासाठी अधिक सक्षम व्यवस्था उभारण्याचा HNCIIचा प्रयत्न आहे. आगामी महिन्यांत याच पायावर पुढील उपक्रम आणि सहकार्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

कर्करोग उपचार रुग्णांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न

आरोग्यसेवेच्या दृष्टीने वंचित भागातील रुग्णांना विशेष कर्करोग उपचारांसाठी अनेकदा मोठ्या शहरांमध्ये किंवा महानगरांमध्ये लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे आधीच कठीण असलेल्या उपचार प्रक्रियेत आर्थिक, व्यवस्थापकीय आणि मानसिक ताणाची भर पडते.

HNCIIचा हा उपक्रम विशेष कर्करोग उपचार केंद्रे, प्रादेशिक आरोग्यसेवा संस्था आणि सामाजिक संस्थांमधील सहकार्य वाढवून ही दरी कमी करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमता विकास आणि सहकार्याच्या माध्यमातून लवकर निदान, तपासणीपासून वेळेवर उपचार आणि त्यानंतरच्या नियमित देखभालीपर्यंत कर्करोग उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णांना आवश्यक मदत मिळवून देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना HNCIIचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुलतान ए. प्रधान म्हणाले, “दर्जेदार कर्करोग उपचार कोणत्या भौगोलिक भागात राहता यावर अवलंबून असता कामा नये. लहान शहरे आणि आरोग्यसेवेच्या दृष्टीने वंचित भागांतील रुग्णांनाही योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना घरापासून दूर जाऊन अतिरिक्त आर्थिक व मानसिक भार सहन करावा लागू नये. या उपक्रमाद्वारे आम्ही तज्ज्ञ वैद्यकीय ज्ञान आणि स्थानिक आरोग्यव्यवस्था यांच्यात अधिक मजबूत संबंध निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गोरखपूर हे पहिले पाऊल आहे; मात्र व्यापक उद्दिष्ट देशभरातील अधिकाधिक रुग्णांपर्यंत उत्तम कर्करोग उपचार पोहोचविणारे सातत्यपूर्ण सहकार्याचे नेटवर्क उभारणे आहे.”

गोरखपूर भेटीदरम्यान झालेल्या चर्चा आणि निर्माण झालेल्या सहकार्याच्या आधारे HNCII पुढील उपक्रम राबवणार आहे. या माध्यमातून प्रादेशिक वैद्यकीय क्षमता अधिक सक्षम करणे, वेळेवर निदानाला प्रोत्साहन देणे आणि तज्ज्ञ कर्करोग उपचारांची उपलब्धता अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाणार आहे.

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

Web Title: Hncii cancer awareness campaign gorakhpur head neck cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness

संबंधित बातम्या

कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला  ठरेल गेमचेंजर
1

कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला ठरेल गेमचेंजर

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड
2

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड

Health Update: ‘एमआरएनए’ लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी
3

Health Update: ‘एमआरएनए’ लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.