Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील ‘या’ ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम

Stomach Issues : पोट साफ नसेल किंवा ॲसिडिटी, गॅस, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर अशा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर दिवसभर कामात लक्ष लागत नाही. अशा किरकोळ समस्यांसाठी औषधांची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टी नैसर्गिकरित्या पोटाच्या समस्यांपासून आराम देऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 08:15 PM
छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम

Follow Us
Follow Us:
  • पचन सुधारण्यास मदत करणारे काही नैसर्गिक पर्याय स्वयंपाकघरातच उपलब्ध असतात.
  • नियमित सेवन केल्यास गॅस, जळजळ आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
  • हे उपाय किरकोळ त्रासात उपयुक्त ठरू शकतात; मात्र समस्या सतत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आजच्या धावपळीच्या युगात लोक कामाला इतकं महत्त्व देत आहेत की असं करताना आरोग्याकडे त्यांच दुर्लक्ष होतं. व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, आणि तासनतास एकाच जागी बसून काम करणे यामुळे अनेकांना पोटाच्या समस्या जाणवत असतात. यामध्ये ॲसिडिटी, गॅस, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येणे यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. तज्ञांच्या मते, जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येते, तेव्हा त्याला ॲसिड रिफ्लक्स म्हणतात. यामुळे छातीत जळजळ आणि जडपणाची भावना येऊ शकते. ही समस्या सामान्य वाटत असली तरी रोजच्या जीवनात याचा मोठा प्रभाव पडत असतो.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचा कायमच तेलकट किंवा चिकट का होते? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

अनेकदा पोटाच्या किरकोळ समस्या जरी जाणवल्या तरी दिवसभर आपले लक्ष कामाकडे राहत नाही. त्याचबरोबर समस्या किरकोळ असल्याकारणाने अनेकजण डाॅक्टरांकडेही जाणं टाळतात. मग प्रश्न असा की, या समस्यांपासून मुक्तता कशी मिळवावी? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ असतात ज्यांचे सेवन करुन पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवला जाऊ शकतो. चला हे कोणते पदार्थ आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.

बडीशेपचे सेवन देईल आराम

पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जुन्या काळापासून बडीशेपचे सेवन केले जाते. यात आढळणारे खास तत्व पोटाच्या स्नायूंना आराम देतात आणि गॅस तयार होऊ देत नाहीत. यासाठी जेवणानंतर चमचाभर बडीशेप चावून खा. यामुळे पोटाची जळजळ दूर होईल आणि तुम्हाला हलकेपणा वाटू लागेल.

जिऱ्याचे सेवनही ठरेल फायदेशीर

स्वयंपाकघरात अनेक भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे का? याचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर यामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. यात आढळणारे घटक पाचक एन्झाइम्सना सक्रिय करतात, ज्यामुळे अन्न जलद आणि योग्यरित्या पचण्यास मदत होते. तुम्ही सकळी कोमट पाण्यात चमचाभर जिरे मिक्स करुन पाण्याचे सेवन करु शकता.

अद्रक खा

पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी अद्रकचे सेवन देखील खूप फायद्याचे मानले जाते. यातील पोषक घटक पोटावरची सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे अन्न लवकर पचायला मदत होते, ज्यामुळे पचनाच्या समस्या कमी उद्भवतात. अनेकदा मंद पचन हे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होण्याचे कारण ठरते अशात अद्रकचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

वेलचीचे सेवन

अनेकदा गोड पदार्थांचा चव वाढवण्यासाठी आणि तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी वेलचीचे सेवन केले जाते. यातील अँटीऑक्सिडंट्स पोट फुगण्याच्या समस्येला कमी करतात. जेवणानंतर २-३ वेलचीचे दाणे दाताखाली चावून किंवा दूधात वेलची पावडर मिक्स करुन तुम्ही याचे सेवन करु शकता.

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

तुळशीचे पान

पोटाला शांत करण्यासाठी हा सर्वात देसी आणि प्रभावी उपाय मानला जातो. यात असलेले नॅचरल घटक पोटाची जळजळ दूर करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे २-३ पान चावून तुम्ही याचे सेवन करु शकता किंवा चहामध्येही तुळशीची काही पाने टाकून याचे सेवन करता येईल.

Web Title: Home remedies for acidity gas heartburn natural eat these kitchen ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • stomach health

संबंधित बातम्या

Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य
1

Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य

Oral Cancer: वेळीच निदान झाल्यास मौखिक कर्करोग होईल पूर्ण बरा; सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
2

Oral Cancer: वेळीच निदान झाल्यास मौखिक कर्करोग होईल पूर्ण बरा; सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Rectal Bleeding: शौचात दिसत आहेत रक्ताच्या गुठळ्या? प्रत्येकवेळी मूळव्याध नाही, Fisher सह अनेक आजारांचे असू शकते कारण
3

Rectal Bleeding: शौचात दिसत आहेत रक्ताच्या गुठळ्या? प्रत्येकवेळी मूळव्याध नाही, Fisher सह अनेक आजारांचे असू शकते कारण

Health Tips: Mutton खाताय? आधीच व्हा सावध! मटणाचे कोणते भाग ठरतात धोकादायक, डॉक्टरही देतात वॉर्निंग
4

Health Tips: Mutton खाताय? आधीच व्हा सावध! मटणाचे कोणते भाग ठरतात धोकादायक, डॉक्टरही देतात वॉर्निंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.