पावसाळ्यात त्वचा कायमच तेलकट किंवा चिकट का होते? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. पण या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट वाटू लागते. हवेतील जास्त ओलाव्यामुळे घाम लवकर सुकत नाही आणि त्वचेवरील नैसर्गिक तेल चेहऱ्यावर तसेच टिकून राहते. तेल, घाम आणि बाहेरील धूळ एकत्र येऊन त्वचेची छिद्रे बंद होऊन जातात, ज्याच्या परिणामामुळे चेहरा खूप जास्त तेलकट किंवा चिकट होतो. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष करण्याऐवजी वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. पावसाळ्यात वाढलेला ओलावा, उन्हाळ्यातील घाम आणि त्वचेतील अतिरिक्त तेलाचे उत्पादन इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचा खूप जास्त चिकट किंवा तेलकट होऊन जाते. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचा तेलकट का होते, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
उतारवयातही त्वचा राहील तेजस्वी! नियमित फॉलो करा ‘या’ स्किन केअर टिप्स, उतारवयातही मिळेल चमकदार ग्लो
तेलकट त्वचेवर मेकअप केल्यास त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. याशिवाय हार्मोन्समधील बदल, तणाव, अपुरी झोप, जास्त तेलकट आणि गोड पदार्थांचे सेवन, चुकीची स्किनकेअर उत्पादने, वारंवार पिंपल्स आल्यानंतर त्वचेला हात लावणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरसोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचा तेलकट झाल्यानंतर सौम्य शाम्पूचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. दिवसभरात २ किंवा ३ वेळा चेहऱ्यावर फेसवॉश वापरावा. शाम्पूचा वापर करून वारंवार त्वचा स्वच्छ केल्यास त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडा करून घ्यावा. त्यानंतर अल्कोहोलमुक्त टोनर आणि हलका, ऑइल-फ्री मॉइश्चरायझरचा वापर करावा. तुमची त्वचा जर खूप जास्त तेलकट असेल तर मॉइश्चरायझरचा वापर करू नये. यामुळे आणखीनच त्वचा तेलकट होऊ शकते. त्वचा खूप जास्त तेलकट झाल्यास ब्लॉटिंग पेपर किंवा स्वच्छ टिश्यूचा वापर करावा. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी होईल. सुंदर दिसण्यासाठी केवळ मेकअपच नाहीतर त्वचेची योग्य काळजी आणि पोषण आहार घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्वचेला आतून पोषण देण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच शरीरातील घाण बाहेर पडून जाते. तसेच आहारात जास्त तळलेले, प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थ खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. तेलकट त्वचेसाठी जेल-बेस्ड किंवा ‘नॉन-कॉमेडोजेनिक’ सनस्क्रीनचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील तेल नियंत्रणात राहण्यास मदत होते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.






