
सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर
Brain Tumor: निष्काळजीपणा की मेंदूतील ट्युमरचे संकेत? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर
पाण्याचे सेवन
आपल्या शरीराला पाण्याची नितांत गरज असते. अनेकदा लोक पाण्याचे खूप कमी सेवन करतात ज्यामुळे शरीरात किरकोळ समस्या जाणवत असतात. अनेकांना हे ठाऊक नाही पण आजारांना दूर करण्यासाठी पाण्याचे सेवन देखील फायद्याचे ठरते. जास्त प्रमाणात पाणी पिल्याने शरीरात अडकलेली घाण पाण्यावाटे बाहेर निघून जाते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सकाळच्या वेळी कोमट पाण्याचे सेवन करत जा, आतड्यांना साफ करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. याव्यतिरिक्त तुम्ही आहारात कलिंगड, टोमॅटो, काकडी आणि ओव्याचेही सेवन करु शकता.
हाय फयबर डाएट
फायबरयुक्त पदार्थ आपल्या शरीरासाठी एका क्लीनरप्रमाणे काम करतात. ते आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण बाहेर काढण्यास आपली मदत करतात. फायबरयुक्त पदार्थांमध्ये ताजी फळ, भाज्या, संपूर्ण धान्य, सुकामेवा आणि बिय यांचा समावेश होतो. याचे सेवन बद्धकोष्ठतेची समस्या रोखते आणि आतड्यांमधील बॅक्टेरियांना मारण्यास मदत करते.
स्मूदीचे सेवन
फळांपासून किंवा भाज्यांपासून तयार केलेली स्मूदी पोटाला साफ राखण्यास मदत करते. स्मूदी ही गाळून पिली जात नाही तर रसासोबत निघालेल्या लगद्याचेही सेवन केले जाते. या लगद्यात फायबरचे प्रमाण दडलेले असते ज्यामुळे याचे सेवन आतडे साफ करण्यास मदत करते. तुम्ही सफरचंद किंवा लिंबाच्या रसालाही तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करु शकता.
हर्बल टी
काही औषधी वनस्पती या पचनसंस्था दुरुस्त करण्यास आपली मदत करतात. हर्बल टीचे सेवन फक्त वजन कमी करण्यास नाही तर पचनक्रियेला सुधारण्यासही मदत करते. बद्धकोष्ठतेसाठी इसबगोल आणि कोरफड यांसारखे घटक फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त अद्रक, लसूण आणि लाल मिर्चीपासून तयार केलेल्या हर्बल टीमध्ये एंटी-माइक्रोबियल गुणधर्म असतात जे हानिकारक बॅक्टेरियांना मारुन टाकण्यास मदत करतात. परंतु यांचे सेवन प्रमाणात करावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.