घरात जागोजागी दिसतायेत फक्त झुरळंच झुरळ? कानाकोपऱ्यात दडून बसलेत, मग स्वयंपाकघरातील या पानांची घ्या मदत
झुरळांचा सतत आपल्या स्वयंपाकघरात होणारा वावर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. अंधाऱ्या खोलीत, गॅसखाली, ड्राॅवरमध्ये, बेडमागे अशा अनेक ठिकाणी त्यांचा हमखास वावर दिसून येतो. दिसायला ही झुरळ लहान असली तरी आपल्या कल्पनेपलिकडे त्यांची संख्या आपल्या घरात दडून बसलेली असते आणि वेळीच त्यांना बाहेरचा रस्ता न दाखवल्यास ही संख्या वेगाने वाढूही शकते. यामुळे स्वयंपाकघर अस्वच्छ होतं आणि आजारपणंही वाढतात अशात वेळीच झुरळांना आपल्या घराबाहेर करणं गरजेचं आहे. तुम्ही यासाठी घरगुती उपायांचा वापर करु शकता.
Mental Health : मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात ‘ही’ लक्षणं, आजच याकडे लक्ष द्या
बाजारात झुरळ घालवण्यासाठी अनेक औषध उपलब्ध आहेत पण ही केमिकलयुक्त औषध दिर्घकाळ घरात वास सोडून जातात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परीणाम होऊ शकतो. यातील रसायनं दीर्घकाळ श्वासोच्छ्वासातून शरीरात गेल्यास ऍलर्जी, दम्याचा त्रास, त्वचेवर पुरळ किंवा डोळ्यांची जळजळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशात नैसर्गिक उपाय आपल्यासाठी अधिक फायद्याचे ठरु शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राच्या मदतीने झुरळांचा नायनाट कसा करायचा याची एक सोपी पद्धत सांगत आहोत. याने आरोग्याला धोका होणार नाही, शिवाय तमालपत्र स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठीही मदत करेल. चला झुरळं घालवण्यासाठी तमालपत्राचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.
उपायाचे फायदे काय
तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
या उपायाता परीणाम किती दिवसांत दिसून येईल?
झुरळ घालवण्यासाठी तमालपत्र एक प्रभावी उपाय आहे. त्याचा वास झुरळांना लगेचच घराबाहेर करण्यास मदत करतो. काही आठवडे नियमित याचा वापर केल्यास घरातील सर्व झुरळं पळवून लावण्यास मदत होईल. हे झुरळांनाच नाही तर इतर लहान किटकांना दूर करण्यासही मदत करते.
उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
नियमित तमालपत्र बदलत राहायचा, कारण काहीवेळाने याचा वास नाहीसा होतो. घरात झुरळांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर पावडर स्वरुपात तमालपत्राचा वापर करणे जास्त फायद्याचे ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.