Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : ती सगळी भूतं होती! ‘चेंबर्स बिल्डिंग’ मेणासारखं वितळू लागलं अंग, माणसं झाली हैवान! एक मुंबई अशीही

मुंबईतील वरळीतील चेंबर्स बिल्डिंगमध्ये घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. चिराग नावाचा मध्यमवर्गीय मुलगा वॉटर प्युरिफायर विकतो, पण तीन महिन्यांत त्याला एकही सेल नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2026 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई म्हणजे रोषणाई! असं जर तुम्ही मनात मानत असाल तर काही अंशी आजही तुम्ही चुकीचे आहात आणि नेहमी असाल. कारण या जगात फक्त मानवी शक्ती राहत नाही. मानवाच्या बरोबर एक अशीही शक्ती येथे वास्तव्य करते जी अदृश्य आहे, पण कालयोगाने मानवी डोळ्यांनाही दिसून येतात आता मुंबई जर या सृष्टीचाच भाग आहे तर येथे ही त्या अदृश्य शक्ती नक्कीच असतील, त्या कुठे जात नाहीत, त्या आपल्यामध्येच असतात. अशी काही घटना मुंबईच्या वरळी भागातील ‘चेंबर्स बिल्डिंग’ येथे घडली आहे.

Horror Story : भयानक हॉस्टेल…! चेहरा काळा, डोळे लाल, प्रवेश करताच दिसते ‘ती’ ची सावली, कथा वाचताच उडेल तुमचाही थरकाप

मुंबईतील Chambers Building येथे घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. चिराग हा एक साधा मध्यमवर्गीय मुलगा, वॉटर प्युरिफायर कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असतो; पण तीन महिने झाले तरी त्याच्याकडून एकही सेल झालेला नसतो. घरची जबाबदारी, आजारी आई आणि बॉसचा तगादा यामुळे तो मानसिक तणावाखाली असतो. मात्र त्या दिवशी नशिबाने त्याची साथ दिली आणि त्याने सलग पाच प्रॉडक्ट विकले. संध्याकाळी त्याला वरळीतील चेंबर्स बिल्डिंगमधील एका मोठ्या कंपनीची लीड मिळाली. चिराग तिथे पोहोचल्यावर त्याला आजूबाजूला विचित्र शांतता जाणवते. गेटवरील वॉचमन त्याच्याकडे पाहून गूढ हसतो, पण चिराग दुर्लक्ष करून आत जातो. लिफ्ट बंद असल्यामुळे तो पायऱ्यांनी पाचव्या मजल्यावर जातो, जिथे त्याला एक व्यवस्थित ऑफिस दिसते.

आत रिसेप्शनवर बसलेली महिला त्याला थांबायला सांगते. वेळ जात राहतो ४ ते ६ वाजेपर्यंत पण ऑफिसमध्ये कोणीच दिसत नाही, फक्त ती महिला आणि एक बंद केबिन. संध्याकाळ होताच ती अचानक मोठ्या ऑर्डरबद्दल सांगते आणि चिराग थांबण्याचा निर्णय घेतो. रात्री ८ वाजता अचानक भीषण आवाज होतो, जणू काही बॉम्बस्फोट झाला आहे; इमारत हादरते, अलार्म वाजतात आणि लोकांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात. घाबरलेल्या चिरागला ती रिसेप्शनिस्ट मात्र शांतपणे सांगते की हे रोजचं आहे. त्यानंतर तिचा चेहरा बदलू लागतो, त्वचा वितळते आणि ती भयानक रूप धारण करते.

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे

चिराग घाबरून देवाचा जप करू लागतो. तेवढ्यात वॉचमन येतो आणि त्याला खाली घेऊन जातो. तो सांगतो की वरच्या मजल्यांवर १९९३ आणि १९९७ मधील दुर्घटनांमध्ये मृत्यू पावलेले आत्मे भटकतात. दुसऱ्या दिवशी चिराग जेव्हा ऑफिसमध्ये सर्व सांगतो, तेव्हा त्याचा बॉस सांगतो की ती बिल्डिंग अनेक वर्षांपासून बंद आहे आणि तिथे कोणीही जात नाही, अगदी वॉचमनही नाही. हे ऐकून चिरागला समजते की काल त्याने ज्यांच्याशी संवाद साधला, ते सगळे जिवंत नव्हते, ते फक्त भूतं होती.

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)

Web Title: Horror story chambers building haunted spot of worli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • horror story
  • worli

संबंधित बातम्या

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…
1

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…

Horror Story : रस्ता चुकला की कुणीतरी चुकवलं? अलिबागच्या प्रवासात घडलेला अंगावर काटा आणणारा अनुभव
2

Horror Story : रस्ता चुकला की कुणीतरी चुकवलं? अलिबागच्या प्रवासात घडलेला अंगावर काटा आणणारा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.