Recipe : बाहेरील फेसळयुक्त पदार्थ आणि अनहायजेनिक फूड्सचे प्रमाण इतके वाढले आहे की स्ट्रीटवरचे अन्नपदार्थ पाहताच किळस येऊ लागते. अशात आपल्या आवडीचे पदार्थ आपण घरीच सहजतेने तयार करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मंचुरियन चिली रेसिपी जाणून घेऊया.
पार्टी स्नॅक्ससाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
रेसिपी थोडी वेळखाऊ पण सहज तयार होईल अशी आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंंत सर्वच वयोगटातील लोकांना इंडो-चायनीज फूड भारीच आवडते. त्यातही मंचुरियन चिली हा एक असा पदार्थ आहे जो व्हेजपासून नाॅनव्हेज लव्हर्सपर्यंत सर्वांच्याच आवडीचा ठरतो. स्टार्टर म्हणून, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा नूडल्स-फ्राइड राईससोबत साइड डिश म्हणून ही रेसिपी छान लागते. भाज्यांचा वापर करून तयार केलेले मंचुरियन बॉल्स बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात, तर वेगवेगळे चटाकेदार साॅसेसमुळे याला खास इंडो-चायनीज चव मिळते. घरी आलेल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी किंवा खास प्रसंगी तुम्ही ही रेसिपीट्राय करु शकता. चला नोट करुन घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
एका भांड्यात कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांदा घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट, काळी मिरी, मीठ, कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करा. मिश्रण खूप सैल वाटत असल्यास थोडे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालू शकता.
कढईत तेल गरम करून मंचुरियनचे गोळे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेले बॉल्स बाजूला ठेवा.
दुसऱ्या कढईत थोडे तेल गरम करा. त्यात चिरलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परता.
आता कांदा आणि शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर झटपट परता. भाज्या पूर्ण मऊ न करता किंचित कुरकुरीत ठेवल्यास चव चांगली लागते.
सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, काळी मिरी आणि आवश्यकतेनुसार मीठ घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा. त्यात ½ कप पाणी घालून उकळी येऊ द्या.
कॉर्नफ्लोअर आणि पाणी एकत्र करून तयार केलेली स्लरी कढईत घाला. सॉस थोडा घट्ट झाल्यावर तळलेले
मंचुरियन बॉल्स घाला आणि १-२ मिनिटे मोठ्या आचेवर परता. गरमागरम मंचुरियन चिली सर्व्ह करा.
Web Title: Hotel style manchurian chili recipe in marathi