(फोटो सौजन्य: Pinterest)
Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
दही ब्रेड चाट
संध्याकाळच्या हलक्या भूकेला शमवण्यासाठी तुम्ही दही ब्रेड चाट ही टेस्टी पदार्थ तयार करु शकता. यासाठी ब्रेडला लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. आता एका बाऊलमध्ये घट्टसर दही, मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चाट मसाला मिसळून सर्व साहित्य एकत्र करा. आता ब्रेडच्या तुकड्यांवर हे तयार मिश्रण पसरवा. मग यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घाला. यानंतर आपल्या टेस्टनुसार यावर हिरवी चटणी, गोड चटणी आणि बारीक शेव घालून पदार्थाला छान सजवा. तुमची दही ब्रेड चाट खाण्यासाठी तयार आहे.
काकडी-पनीर बाईट्स
काकडी आणि पनीर दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे पदार्थ ठरत असतात. यापासून तुम्ही एक टेस्टी आणि हेल्दी असा स्नॅक्सचा पदार्थ तयार करु शकता. यासाठी प्रथम काकडीचे गोल तुकडे करा आणि मग पनीरचे क्यूबमध्ये तुकडे करा. आता काकडीच्या गोल कापांवर हे पनीरचे क्यूब्स ठेवा. यावर काळे मीठ, भाजलेले जिरे आणि चाट मसाला शिंपडा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर हिरवी चटणी देखील घालू शकता. हलक्या नाश्त्यासाठी हा पदार्थ चांगला पर्याय ठरेल.
Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
कोल्ड सँडविच
सँडविच लव्हर्ससाठी खास तुम्ही तेल आणि गॅसशिवाय व्हेज कोल्ड सँडविच तयार करु शकता. यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा आणि गाजराला बारीक चिरुन एकत्र करा. मग यात मेयॉनीज, काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घाला. एका ब्रेडच्या स्लाईसवर हे मिश्रण समान पसरवा आणि दुसरा ब्रेड स्लाईस यावर ठेवून हलका दाब द्या. चाकूने सँडविचचे दोन तुकडे करा आणि कोल्ड सँडविच खाण्यासाठी सर्व्ह करा.






