
जखम झाल्यानंतर हळद लावणे आहे कितपत योग्य? 'या' चुका केल्यास उद्भवू शकतो त्वचेसंबंधित इन्फेक्शनचा गंभीर धोका
हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक?
जखमेवर हळद लावावी की नाही?
कोणत्या जखमेवर हळद लावावी?
भारतीय स्वयंपाक घरात विविध मसाले उपलब्ध असतात. प्रत्येक पदार्थांचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय शरीरासाठी सुद्धा केला जातो. त्यातील अतिशय शक्तिशाली आणि गुणकारी पदार्थ म्हणजे हळद. घरात कोणालाही लागल्यानंतर किंवा दुखापत झाल्यानंतर सगळ्यात आधी जखमेवर हळद लावली जाते. हळद लावल्यामुळे रक्त थांबते. मागील बऱ्याच वर्षांपासून हा उपाय केला जात आहे. जखम झाल्यानंतर किंवा हाडांना मार लागल्यानंतर त्यावर हळदीचा लेप किंवा चिमूटभर हळद लावली जाते. पण शरीरावर झालेल्या प्रत्येक जखमेवर हळद लावणे योग्य नाही. जखम लवकर बरी करण्यासाठी लावलेली हळद त्वचेसंबंधित गंभीर समस्या निर्माण करू शकते. चला तर जाणून घेऊया जखम बरी करण्यासाठी कोणत्या वेळी आणि कधी हळद लावावी? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
भारतीय स्वयंपाक घरात हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक पदार्थाची चव वाढवण्यासोबतच रंग सुद्धा वाढवण्यास मदत करते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा शक्तिशाली घटक आढळून येतो. ज्यामुळे सूज कमी होण्यासोबतच बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते. शरीराच्या कोणत्याही अवयवावर सूज आल्यानंतर हळद आणि तुरटीचा लेप करून लावला जातो. प्राण्यांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, हळद लावल्यामुळे जखम लवकर भरते आणि नवीन टिश्यू तयार होण्यास मदत होते. याशिवाय मानवावर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जखम झाल्यानंतर हळद लावल्यास जखमेवर आलेली सूज कमी होते आणि जखम लवकर भरून वेदना आणि दुर्गंधीपासून सुटका मिळते.
मागील बऱ्याच वर्षांपासून हळदीचा वापर आयुर्वेद आणि पारंपारिक उपचारांमध्ये केला जात आहे. पण प्रत्येक व्यक्तीला हळद सूट होईल असे नाही. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी हळदीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट घेणे फार आवश्यक आहे. हलकंसं भाजल्यानंतर किंवा छोट्या मोठ्या जखमेवर हळद लावणे योग्य आहे. पण शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा किंवा खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास हळदीवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
जखमेवर थेट हळद लावल्यामुळे जळजळ, खाज किंवा ॲलर्जी इत्यादी समस्या उद्भवू शकतात. अनेक लोक जखम झाल्यानंतर हळद लावतात आणि नंतर जास्त लक्ष दिले जात नाही. पण असे केल्यामुळे छोटी जखम आणखीनच मोठी होते. त्यामुळे जखमेवर हळद लावताना योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. जखमेवर हळद लावण्याआधी जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर हळद लावावी. छोटीशी जखम असल्यास हळद लावून त्यावर पट्टी बांधावी. अन्यथा जखमेवर माशा किंवा बारीक जिवाणू चिकटण्याची जास्त शक्यता असते. जखम झाल्यानंतर सूज येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: जखमेवर थेट स्वयंपाकघरातील हळद लावणे नेहमीच योग्य मानले जात नाही. हळद निर्जंतुक (sterile) नसल्यामुळे उघड्या जखमेत ती लावल्यास दूषित पदार्थ जाऊन संसर्गाचा धोका वाढू शकतो.
Ans: हात स्वच्छ करून जखमेला स्वच्छ वाहत्या पाण्याने हलकेच धुवावे. रक्तस्राव होत असल्यास स्वच्छ गॉज किंवा कापडाने हलका दाब द्यावा. जखम खोल असल्यास किंवा रक्तस्राव थांबत नसल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.
Ans: उघड्या जखमेवर निर्जंतुक नसलेली हळद लावल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घरगुती उपाय म्हणून हळद थेट जखमेवर लावण्याऐवजी योग्य wound-care पद्धतीचा अवलंब करणे सुरक्षित आहे.