Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसा ओळखू शकतो मौखिक कर्करोगाचा धोका? त्याचे कारणं काय? तज्ज्ञांचा दिला सल्ला

मौखीक कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आपण हा कर्करोगाचा धोका कसा ओळखू शकतो. त्याचे कारणं काय आहेत. यावर तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. बघुयात...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2025 | 09:36 AM
कसा ओळखू शकतो मौखिक कर्करोगाचा धोका? त्याचे कारणं काय? तज्ज्ञांचा दिला सल्ला (फोटो सौजन्य- istock)

कसा ओळखू शकतो मौखिक कर्करोगाचा धोका? त्याचे कारणं काय? तज्ज्ञांचा दिला सल्ला (फोटो सौजन्य- istock)

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सर नाव ऐकताच धासकी बसते. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. ब्लड कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, मौखिक कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, अश्या अनेक प्रकार आहेत. आता मौखिक कर्करोग हा कसा होतो आणि कोणती तपासणी केल्याने हा रोग समजतो. लक्षणे काय आहे? यावर डॉ विजय सुतार काय सांगतात बघुयात.

कोलेस्ट्रॉलचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘हा’ फळ; अनेक आजारांपासून दूर देखील करतो; काय आहे फायदे?

आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे वाढते सेवन. आपला देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू, गुटखा, सिगारेट, किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

मौखिक कर्करोगाची (ओरल कॅन्सर) सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडांत चार बोट घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का, हे तपासा. तसे होत नसेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क साधा. मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे. मौखिक स्वच्छतेची काळजी घेणे, तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. तोंडाच्या आत काही बदल दिसल्यास किंवा अन्न गिळताना त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉ विजय सुतार यांनी यावर सविस्तर सांगितलं आहे. डॉ विजय सुतार हे वैद्यकिय प्रशासक, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, साताराचे आहेत. ते काय सांगतात बघुयात.

डॉ. विजय सुतार (वैद्यकिय प्रशासक, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की, तोंडात पांढरे-लालसर पुरळ किंवा फोड,तोंड उघडण्यात अडचण,जीभ बाहेर काढतांना त्रास, आवाजात झालेला बदल यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांना सूज, जळजळ आणि इतर संसर्ग होऊ शकतात. या दीर्घकालीन संसर्गामुळे त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो. मौखिक स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा दात घासणं, फ्लॉसिंग करणं, टूथब्रश वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे.

चांगल्या मौखिक आरोग्यासाठी सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित व्‍यायाम करणे तसेच ॲन्‍टीऑक्‍सिडंट, प्रोटीन, फायबरर्सचा समावेश असलेला पुरक आहार घेणे गरजेचे आहे. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व वेळीच निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी तुमच्या तोंडात होणाऱ्या बदलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. ठराविक कालावधीनंतर तोंडाची व दातांची तपासणी करत राहायला हवी असेही डॉ सुतार यांनी स्पष्ट केले.

Hip Dislocation: हिप डिसलोकेशन म्हणजे काय? काय आहे प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार?

Web Title: How can we identify the risk of oral cancer what are its causes expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • cancer
  • daily health
  • Doctor advice

संबंधित बातम्या

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

5 वेळा सर्जरी तरीही पुन्हा Oral Cancer परतला, Sharib Hashmi च्या बायकोचा आजार; किती वेळा परत येऊ शकतो कॅन्सर
2

5 वेळा सर्जरी तरीही पुन्हा Oral Cancer परतला, Sharib Hashmi च्या बायकोचा आजार; किती वेळा परत येऊ शकतो कॅन्सर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.