'जिंगल बेल्स'न गाणे प्रसिद्ध कधी झाले?
२५ डिसेंबर ला जगभरात सगळीकडे मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा केला जातो. नाताळ सणाच्या दिवशी अनेक घरांमध्ये केक बनवला जातो. शिवाय लहान मुलांना गिफ्ट्स दिले जातात. नाताळ सण म्हंटल की सगळ्यांना सांताक्लॉजची आठवण येते. पांढरी बर्फाळ दाढी, जाड चष्मा आणि लाल-पांढरे कपडे घातलेल्या सांताक्लॉज पाहून लहान मुलं आनंदाने नाचू लागतात. या दिवशी सगळीकडे ‘जिंगल बेल्स’ हे गाणं लावून आनंद साजरा केला जातो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. शिवाय पार्टीनिमित्त सगळे लोक एकत्र येऊन आनंद व्यक्त करत असतात. पण तुम्हाला ‘जिंगल बेल्स’ या गाण्याचा इतिहास माहित आहे का? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
नाताळाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये ‘जिंगल बेल्स’ हे गाणं लावलं जात. पण नाताळच्या दिवशी लावले जाणारे जिंगल बेल्स गाणं याचा नाताळ सणाशी कोणताही संबंध नाही. जिंगल बेल्स हे थँक्सगिव्हिंग गाणे आहे, जे 1850 मध्ये जेम्स पियरपॉन्ट नावाच्या संगीत दिग्दर्शकाने लिहिले होते. त्यानंतर 857 मध्ये पहिल्यांदा सामान्य प्रेक्षकांसमोर जिंगल बेल्स हे गाणं गाण्यात आलं होत. जेम्स पिअरपॉन्टने या गाण्याचे नाव ‘वन हॉर्स ओपन स्लेघ’ ठेवले होते. त्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे गाणं याच नावाने प्रसिद्ध झाले. 1890 पासून पुढे नाताळ सणाच्या दिवशी सगळीकडे लावले जाते.
जिंगल बेल्स या गाण्याचा कोणताच अर्थ नाही. मात्र जेम्स पिअरपाँट यांनी गायलेले गाणे हळूहळू नाताळच्या पार्ट्यांमध्ये वाजू लागले आणि सगळीकडे प्रसिद्ध झाले. त्यामुळे नाताळ सणाच्या दिवशी हे गाणं सर्व घरांमध्ये लावलं जात. या गाण्याशिवाय नाताळ सण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. ‘वन हॉर्स ओपन स्लीघ’ हे नाव बदलून जिंगल बेल्स असे नाव देण्यात आले.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
डैशिंग थ्रू द स्नो
इन अ वन हॉर्सओपन स्लेई,
ओ द फ़ील्ड्स वी गो
लाफिंग आल दा वे
बैल्स ओन बॉब टेल्स रिंग
मेकिंग स्पिरिट्स ब्राइट
वट फन इट इस टू लाफ एंड सिंग
अ स्लायिंग सोंग टूनाईट
ओ, जिंगल बैल्स, जिंगल बैल्स
जिंगल आल दा वे
ओ वट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई
ओ, जिंगल बैल्स, जिंगल बैल्स
जिंगल आल दा वे
ओ वट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई