Christmas 2024: तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी
25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जाईल. हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोकं आपल्या जवळच्या व्यक्तिंना, मित्रांना आणि कुटुंबियांना भेटवस्तू देतात. केवळ घरातच नाही तर शाळा, कॉलेज आणि ऑफीसमध्ये देखील ख्रिसमस साजरा केला जातो. पण कोणाला काय गिफ्ट द्यावं हेच आपल्याला सूचतं नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही असे गिफ्ट आयडीया सांगणार आहोत, जे तुम्ही कोणत्याही व्यक्तिला भेट देऊ शकता. कमी बजेटमध्ये तुम्ही एक चांगला गिफ्ट निवडू शकता.
Year Ender 2024: यावर्षी मोबाईल युजर्ससाठी बदलले अनेक नियम, वाचा संपूर्ण यादी
ज्यूकबॉक्स 30 स्पीकर त्याच्या 40W आउटपुटसह शक्तिशाली आवाज देतो. हा स्पीकर ब्लूटूथ वर्जन 5.2 ला सपोर्ट करतो आणि कोणत्याही पार्टीला अधिक चांगली बनवण्यासाठी RGB लाइटिंग समाविष्ट करतो. यात वायर्ड माइक, रिमोट आणि यूएसबी, टीएफ कार्ड आणि एयूएक्स इनपुटचे पर्याय आहेत. यामध्ये टाइप-सी चार्जिंग केबल उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही सहज हा स्पीकर चार्ज करू शकता. त्याची किंमत 1,649 रुपये आहे, जी तुम्ही Lyne च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्ही Boult ची ही फास्ट चार्जिंग पॉवर बँक कुठेही सहजपणे घेऊन जाऊ शकता. यात मल्टी चार्जिंग पोर्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी दोन स्मार्टफोन चार्ज करू शकता. ही पॉवरबँक 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे त्याचे वजनही केवळ 300 ग्रॅम आहे. त्यामुळे ही पॉवरबँक प्रवासात घेऊन जाणं देखील अगदी सोप आहे. तुम्ही ही पॉवरबँक फ्लिपकार्टवरून 1,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
OnePlus Nord Buds 2r इयरबड्स ख्रिसमसला भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे बड्स 12.4mm ड्रायव्हरसह येतात, ज्यात ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे. यात 480 mAh बॅटरी आहे, जी 38 तासांचा प्ले टाइम देते. हे इयरबड्स टाइप-सी चार्जिंग केबलसह येतात, ज्यामुळे ते चार्ज करणे खूप सोपे होते. तुम्ही ते फ्लिपकार्टवरून 1,699 रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी करू शकता.
Boult चे हे स्मार्टवॉच अतिशय कमी बजेटमध्ये प्रीमियम लूक देते. हे स्मार्टवॉच गोल डायलसह येते, ज्यामध्ये जिंक ऑलय मॅटेलिक फ्रेम आहे. याला धूळ प्रतिरोधासाठी IP67 रेट केले गेले आहे आणि त्यात स्मार्ट नोटिफिकेशन, सेडेंटरी वॉटर इनटेक रिमाइंडर आणि वॉयस असिस्टेंस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हे स्मार्टवॉच तुम्ही फ्लिपकार्टवरून 1,899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
UBON CL-120 इयरफोन्सची ऑडियो क्वालिटी कमाल आहे. हे सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी डिझाइन केलेले आहेत. तुम्हाला कोणाशीही बोलायचे असेल, गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडीओ पाहायचा असेल, तुम्हाला या इअरफोन्समध्ये स्पष्ट आवाज ऐकू येईल. त्याची स्टायलिश आणि टिकाऊ रचना याला आणखी खास बनवते. हे फ्लिपकार्टवर 1599 रुपयांना उपलब्ध आहे.